एमएसआरडीसी( MSRDC )चे काम गुप्तपणे सुरू? फलका अभावी कामाने मार्कंडादेव ग्रामस्थांमध्ये संशयाचे वातावरण !
सोनू वाळके,उपसंपादक,लोकवाद न्युज.
चामोर्शी ( मार्कंडा देव) :-
विदर्भाची काशी म्हणून देशात सर्वत्र बहुचर्चित असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देव येथे MSRDC विभागाकडून सोंदीर्यकरणचे काम गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे. मात्र सदर काम अनेक नियमन बगल देत चालू असून फलकाविना कामाने मार्कंडा देव येथील कामाविषयी गावाशीयात संभ्रम निर्माण होत आहे.
शासन निर्णय नुसार कुठलीही काम त्या कामाची माहिती सादर करून एकंदरीत नाम फलक लाऊन चालू केली जाते. ज्यामुळे नागरिकांना सदर काम कुठल्या योजनेतून, आणि कोण्या कंत्राटदाराकडून , त्याच्या कालावधी, निधी, इत्यादी बाबतीची माहिती सादर करून कामाला गती दिल्या जाते मात्र मार्कंडा येथील चालू असलेल्या कामाबाबत गाव वासियाना तिळमात्रही कल्पना नसल्याने गव्वाशीयांत मोठी शंका कुशंका निर्माण झालेली आहे. या संदर्भात गावकरी बांधवांनी तहसीलदार चामोर्शी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. तर खुद तहसीलदार चामोर्शी यांनी त्याच क्षणी आर्किटेक अधिकारी यांना फोन करून एक बैठक मार्कंडा देव च्या ग्रामस्थानसोबत लावावी व गावाकऱ्यांची मतभेत दूर करावे अशी सूचना दिल्या ची माहिती आहे.
मात्र कंत्राटदारां कंपनी कडून तहसीलदारांच्या आदेशाला हुलकावणी देत अजून पर्यंत कामाचे फलक लावण्यात आले नसल्याने गावकऱ्यांत नाराजी पसरली आहे. — “काम वैध असेल तर फलक लावण्यात काय अडचण?” असा सवालही नागरिकांत होत असून गावकऱ्यांनी लवकरात लवकर कामाचे तपशील सार्वजनिक करावेत व फलक लावून पारदर्शकता राखावी, अशी मागणी पुन्हा एकदा प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा काम बंद करू अशा इशारा दिला आहे.







