HomeBreaking Newsजाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक प्रभागात मातब्बर इच्छुकांची कोंडी

जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक प्रभागात मातब्बर इच्छुकांची कोंडी

जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक प्रभागात मातब्बर इच्छुकांची कोंडी

मुल नगर परिषद; राजकीय पक्षातील गट-तट उफाळून येण्याची शक्यता

मुल नगर परिषदेच्या प्रभागाचे आरक्षण झाले जाहीर

निवडणूक लढविण्याऱ्या काही इच्छुकांमध्ये नैराश्य

गौतम जीवने मुल प्र. ; दि.९/१०, कन्नमवार सभागृह मुल : आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय आरक्षण रचना बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी कन्नमवार सभागृह मुल येथे जाहीर करण्यात आली. मूळ नगरपरिषदेच्या १० विभागांमधील २० नगरसेवक पदांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक प्रभागात मातब्बर इच्छुकांची कोंडी झाली आहे. त्यामुळे “कही खुशी कही गम”असे वातावरण निर्माण झाले आहे.

मूल नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. पीठासीन अधिकारी अजय चरडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप दोडे यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. मूल नगर परिषदेच्या एकूण १० प्रभागांमध्ये २० नगरसेवक पदांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. अलिकडेच नगराध्यक्ष पद इतर मागासवर्गीय (महिला) वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे हे लक्षात घ्यावे. प्रभाग क्रमांक १: (अ) अनुसूचित जमाती महिला आणि (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २: (अ) इतर मागासवर्गीय महिला आणि (ब) सर्वसाधारण, प्रभाग ३: (अ) इतर मागासवर्गीय महिला आणि (ब) सर्वसाधारण, प्रभाग ४ हा (अ) इतर मागासवर्गीय आणि (ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग ५ (अ) इतर मागासवर्गीय महिला आणि (ब) सर्वसाधारण, प्रभाग ६ (अ) इतर मागासवर्गीय आणि (ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग ७ (अ) अनुसूचित जमाती आणि (ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग ८ (अ) अनुसूचित जाती आणि (ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग ९ (अ) अनुसूचित जाती महिला आणि (ब) सर्वसाधारण, प्रभाग १० (अ) अनुसूचित जाती महिला आणि (ब) सर्वसाधारण यासाठी राखीव घोषित करण्यात आला आहे.

मुल येथील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार

मुल शहरात अनेक प्रभागात फेरबदल झाले आहेत. त्यामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात राजकीय पक्षातील गट-तट उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फेरबदल हे अनेक विद्यमान आणि इच्छुकांना डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे राजकीय आणि गटा-तटाचा समतोल साधत निवडणूक लढावी लागणार असल्याची चिन्हे आतापासून दिसत आहेत. प्रभाग आरक्षणामुळे अनेक दिग्गजांचे जुने प्रभाग आरक्षित झाले आहेत.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments