HomeBreaking Newsनामशेष होत चाललेल्या वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन महत्वाचे; चि. व. प.अधिकारी महेशकर

नामशेष होत चाललेल्या वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन महत्वाचे; चि. व. प.अधिकारी महेशकर

नामशेष होत चाललेल्या वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन महत्वाचे; चि. व. प.अधिकारी महेशकर 

कर्मवीर महाविद्यालय सह वनविभागाचा वन्यजीव सप्ताह त्यालीतून संदेश

दुर्योधन घोंगडे चंद्रपूर; दि. 7/ 10   मा. वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव सप्ताह निमित्त चिचपल्ली वन परिक्षेत्रातील संपूर्ण वनाधिकारी व वनमजूर सह बाईक रॅली काढण्यात आली असून नामशेष होत चाललेल्या वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन महत्वाचे असल्याचे मत चिचपल्ली वनवनपरिक्षेत्र अधिकारी महेशकर यांनी व्यक्त केले.

चिचपल्ली परिक्षेत्रा अंतर्गत गावांमध्ये वन्यप्राण्या विषयी व वृक्ष संवर्धनाविषयी उपदेश देत , वन्य प्राण्यांचे रक्षण झालेच पाहिजे, जल, जंगल, जमीन महत्वाची, झाडे लावा झाडे जगवा अशा एक ना अनेक नारेबाजी करीत जनजागृती करण्यात आली. नामशेष होत चाललेल्या वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करून हवामाना बदलमुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामावर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच अंधश्रद्धा निर्मूलनावर सुद्धा विविध कार्यक्रम घेण्यात  घेण्यात आले.

सदर कार्यक्रमाला माननीय वाळके मॅडम प्राचार्य कर्मवीर महाविद्यालय मुल व शिक्षक वृंद,  मा कुंदोजवार (अंधश्रद्धा निर्मूलन अध्यक्ष राजुरा),  संजीवन पर्यावरण संरक्षण समिती मुल चे अध्यक्ष श्री उमेश भाऊ झिरे , चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी महेशकर मॅडम ,  परिविक्षाधिन वन परिक्षेत्र अधिकारी गायकवाड मॅडम चिचपल्ली परिक्षेत्रातील  वन कर्मचारी व वन मजूर आणि कर्मवीर महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. कर्मवीर महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सदर रॅलीचे समारोप करण्यात आले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments