जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शाळेला सुटी जाहीर, पालकांची तारांबळ
अकाली सुटीने विद्यार्थी व पालकांना मोठा त्रास
प्रतिनिधी मूल; काल सायंकाळ पासूनच सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे नदी नाल्यांना पावसाचे पाणी वाढून पूर येण्याचा धोका संभवतो परिणामी शालेय विद्यार्नाथी यांना त्रास होऊ नये व मुसळधार पावसाने विद्यार्थीजी च्या जीवितास धोका निर्माण होई नये याकरिता मान. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी आपत्काली ( कलेक्टर हॉलिडे) सुट्टी जाहीर केली. मात्र शाळा भरल्यानंतर अकाली सुट्टी जाहीर केल्याने पालकांची मोठी तारांबळ उडाली यात शालेय विद्यार्थी, पालक यांना मोठा मानसिक शारीरिक त्रास त्रास सहन करावा लागला. मान. जिल्हाधिकारी सूचनेंनी शाळानी पालकांना मेसेज.फोन लाऊन अचानक सुटी झाल्याचे सूचना दिल्याने पालकांची चांगलीच तारांबळ झाली. जोरदार पावसात मुलांना आणायचे कसे असा मोठा प्रश्न निर्माण झाला असून शाळांनी आधीच सूचना द्यायला पाहिजे होती नाही तर शाळाचं भरवायची नव्हती असे नाराजीचे उद्गार पालक वर्गात होत आहे.
अखेर जिल्हाधिकारी सूचनेंनी शाळांना सुटी दिल्या नंतर पावसाला विराम पडला तर तासिका संपून सुद्धा आला नाही मात्र विशेष..







