Homeआरोग्य“चिचाळा गावात निवासी आरोग्य सेविका अभावी आरोग्य समस्या गंभीर

“चिचाळा गावात निवासी आरोग्य सेविका अभावी आरोग्य समस्या गंभीर

“चिचाळा गावात निवासी आरोग्य सेविका अभावी आरोग्य समस्या गंभीर”

चिचाळा येथील सामाजिक कार्यकर्ते यांची जी. प. कडे मागणी”

लोकवाद मूल, दि. 26 सप्टेंबर – मुल तालुक्यां अंतर्गत  येणाऱ्या चिचाळा गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात निवासी आरोग्य सेविकेचे पद रिक्त असल्यामुळे गावातील आरोग्याची समस्या गंभीर बनली असून. रात्रौ येणाऱ्या गर्भवती महिला, बालक, वृद्ध आणि अपघातग्रस्त रुग्णांना प्राथमिक उपचार मिळत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून आरोग्य सेविकाचे रिक्त पद तात्काळ भरावे अशी मागणी चिचाळा गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी जी. प. कडे केली आहे.

तालुक्यातील मोठी लोकवस्ती असलेल्या चिंचाळा गावात आरोग्याची मोठी समस्या असून लहान मुले गर्भवती, व स्थानदा माता , वृद्ध , अपंग, अपघात ग्रस्त आदीना गावातील व  गाव परिसरातील नागरिकांना मूल शहरापर्यंत 10–15 कि.मी. अंतर पार करावे लागू नये सदर रुग्णांना तात्काळ प्राथमिक उपचार मिळावे , या उद्देशाने गावात प्राथमिक उप प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापित आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून सदर केंद्रात निवासी आरोग्य सेविका नसल्याने रुग्णांची रात्रीच्या दरम्यान मोठी गैरसोय होत असून उपचार मिळत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी छोटा आजार  मोठा होऊन उपचार अभावी जीव जाण्याची धोका नाकारता येत नाही.

करिता समस्यांची जाण ठेऊन तत्काळ निवासी आरोग्य सेविका देण्यात यावे अशी मागणी चिचाळा येथील गंभीर समस्येवर लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थ प्रतिनिधी प्रविण बोबाटे, सुरज टिकले, मुकेश गांडलेवार आणि संदेश निमगडे यांनी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाकडे केलेली आहे.

एवढेच नाही तर माजी मंत्री मान. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, बल्लारपूर विधानसभा यांना माहिती दिली गेली असून, आरोग्य जिल्हा अधिकारी, चंद्रपूर यांनाही ही गंभीर समस्या स्पष्ट केली आहे. आमदारांनी तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास अधिकृत पत्राद्वारे रिक्त पद भरून त्वरित सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबद्दल गावात आभार व्यक्त केले जात आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments