जिल्हा परिषद शाळा सुशी येथील शाळा व्यवस्थापन समिती द्वारा श्री मास्कर मधुकर शेंडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार
सुशी दाबगावं, लोकवाद , दिनांक 31-08-2025 ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शात सुशी येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री. भास्कर शेंडे नियत सेवा वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या बाबत त्यांच्या सपत्नीक सत्कार करण्याचा हेतूने निरोप समारंभाचा कार्यक्रम शाळेत संपन्न झाला.
या कार्यक्रमास सुशी केंद्राचे केंद्रप्रमुख मा. भाकरे सर, चिचाळा केंद्राचे केंद्रप्रमुष्ष भा. गव्हारे सर, शाळेच्या शा.व्य. समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य पालक वर्ग शिक्षक वृंद विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
सत्कार मूर्ती शेंडे सर यांनी सेवा कार्याला 17 जानेवारी 1990 ला सुरुवात केली असून 31 ऑगस्ट रोजी त्यांचा सेवा काळ समाप्त झाला. याप्रसंगी शाल व श्रीफळ देऊन श्री. शेंडे सर यांचा सहप्तनीक सत्कार करण्यात आला. यात गोड अल्पोपहारचा कार्यक्रमही पार पडला असून शेंडे सरांसह अनेकांनी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकीत आपल्या भावना व्यक्त केल्या.







