चिचाळा गावातील मुख्य चौकात तान्हा पोळा सणाचा एक आनंददायी कार्यक्रम पार पडला.
प्रतिनिधी मुल, तालुक्यातील बहुसंख्य लोकवस्ती असलेल्या चिचाळा गावात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात ताना पोळा साजरा करण्यात आला. यात सामाजिक कार्यकर्ते प्रविण बोबाटे, सूरज टिकले संदेश निमगडे या युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी मुलांसाठी बुक, पेन आणि पारलेजी बिस्कीट वाटप केले. उपक्रमात गावातील मुख्य चौकात नंदगोपाल नंदीबैल घेऊन कार्यक्रमास मोठ्या संख्येनी उपस्थिती दर्शवली ज्यामुळे गावात उत्साह आणि आनंदाची लाट पसरली.
कार्यक्रमाचा उद्देश हा केवळ सणापूरताच मर्यादित मुलांमध्ये शिक्षणाविषयी उत्सुकता वाढवणे, सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणे आणि सणाचा आनंद अधिकाधिक वाढवणे असा असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यात बोलले आहेत. गावकऱ्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. मुलांच्या चेहऱ्यावर दिसलेले हसू आणि आनंद, नंदीबैलसह साजरा केलेले रंगबेरंगी क्षण, आणि कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी निर्माण केलेली सकारात्मक ऊर्जा यांनी मुख्य चौकात उत्सवाचे वातावरण निर्माण केले.







