Homeचंद्रपूरछायाचित्र दिनाच्या निमित्ताने मूल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप

छायाचित्र दिनाच्या निमित्ताने मूल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप

छायाचित्र दिनाच्या निमित्ताने मूल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप 

मुल प्रतिनिधी दि.19/8, छायाचित्र दिनाच्या निमित्ताने मूल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा छायाचित्र व्यवसायी संघटना मूलचे सभासद वतीने फळे व बिस्किटे वाटप करण्यात आले.

दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला जातो. हा दिवस छायाचित्रणाच्या कला, विज्ञान आणि प्रभावाचा सन्मान करतो.

जगभरातील लोक या दिवसाचा वापर क्षण टिपण्याची आणि प्रतिमांद्वारे कथा सांगण्याची त्यांची आवड सामायिक करण्यासाठी करतात. छायाचित्रण आपल्याला क्षण टिपण्यास, आठवणी जपण्यास आणि भावना व्यक्त करण्यास मदत करते. ते संस्कृती आणि पिढ्यांमधील लोकांना जोडते. व्यावसायिकांपासून ते छंदप्रेमींपर्यंत, सर्वांना चित्रांच्या शक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी आमंत्रित करतात असे एक ना अनेक उपक्रम छायाचित्र दिनाच्या निमित्ताने पहावयास मिळतात. त्याचाच एक भाग म्हणून मुल येथील छाया चित्रकार व्यवसायी संघटनाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे  यावर्षी सुद्धा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना केळी, बिस्किटे, सफरचंद, आदी वस्तूचे वाटप करण्यात करून छायाचित्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

त्यावेळी उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. लाडे, सह डॉ. ,अधिपरिचारिका, आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी, तथा छायाचित्र व्यवसायी संघटना मूलचे सभासद, राजेश साखरकर, महेश भुरसे, राहुल मंथनवार,  प्रवीण गभने, विकास चलाख, लखन भोयर, पिंटू चिलमुलवार,  प्रवीण चलाख, अजित अंबोरकर, जितू गिरडकर, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments