Homeआरोग्यपोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून द्या

पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून द्या

पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून द्या

 शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार यांची मागणी

सुभाष घोंगडे पोंभूर्णा :-येथील ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध नसल्याने रूग्णांना आरोग्याच्या दृष्टीने नेहमीच अडसर निर्माण होत होते.पोंभूर्णा तालूका ग्रामीण भाग असल्याने येथील नागरिकांना चंद्रपूरला सोनोग्राफी करण्यासाठी ये जा करणे खर्चिक आहे‌.तालुक्यातील या महत्त्वाच्या समस्यांपासून नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख युवराज धानोरकर यांच्या उपस्थितीत पोंभूर्णा तालूका प्रमुख पंकज वडेट्टीवार यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने दि.१४ ऑगस्ट ला नागपूर येथे आयोजित जिल्हा निहाय आढावा बैठकीच्या कार्यक्रमात

शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.

पोंभुर्णा तालुका हा आदिवासी बहूल तालूका म्हणून ओळखल्या जातो. तालुक्यात ३१ ग्रामपंचायत असून जवळ जवळ ५५ ते ६० हजार च्या आसपास लोकसंख्या आहे.तालुक्यात ११ उपकेंद्रे असून पुन्हा नवीन ३ उपकेंद्रे तयार होणार आहेत.तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हावे यासाठी पोंभुर्णा तालुक्यात १४ कोटी ८७ लाख रुपयाची ग्रामीण रुग्णालय इमारतीचे बांधकाम करून तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध झाली आहे.मात्र ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत असून सुद्धा यात अनेक महत्वाचे उपकरणे उपलब्ध नसल्याने गंभीर व अतीगंभीर रुग्णाची मोठी पंचाईत होते.आजमितीला रुग्णालयात फक्त एक एक्सरे मशीन उपलब्ध आहे.

तालुक्यातील गर्भवती माता,जोखमीचे माता, यासोबतच किडनी, लिव्हर,अपेंडिक्स या आजारासंबंधीत रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत.पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध नसल्याने उपचार घेत असलेल्या रुग्णांना समस्यांचा सामना करावा लागतो.रुग्णांना सोनोग्राफी करण्यासाठी ५० किमी अंतरावर असलेल्या जिल्ह्याच्या ठिकाणी चंद्रपूरला जावे लागते.त्यामुळे सोनोग्राफी मशीन तालुक्यात उपलब्ध झाल्यास रुग्णांची गैरसोय होणार नाही व डॉक्टरांना सुद्धा उपचार करण्यास सोपे जाणार.रुग्णांना सुविधा मिळावी यासाठी पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख पंकज वडेट्टीवार यांनी शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख युवराज धानोरकर,युवासेना जिल्हा प्रमुख शैलेश केळझरकर,विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर, पोंभूर्णा तालूका प्रमुख पंकज वडेट्टीवार,बल्लारपूर तालुका प्रमुख जमील शेख, मूल शहर प्रमुख विशाल नागुलवार,उमेश कुंडले,कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments