हर घर तिरंगा – घर घर तिरंगा जयघोषाने निघणार भव्य तिरंगा यात्रा
मुल येथील तिरंगा यात्रा समितीचा उपक्रम
प्रतिनिधी, मुल ; भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या भारतमातेच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा घर घर तिरंगा उद्घोषणेने मुल शहरात शासकीय कृषी महाविद्यालय पासून तहसील कार्यालय पर्यंत सकाळी 7.00 वाजता विशेष आकर्षण असलेली 500 फूट तिरंगा ध्वजाची भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीपर व झाडीपट्टीतील गीतांचा बहारदार कार्यक्रम सुद्धा स्व. मा. सा. कन्नमवार सभागृह, मुल येते सकाळी 9.30 वाजता होणार असून यात झाडीपट्टी कलाकार हिरालाल पेंटर, युवराज प्रधान, अमर मसराम, संतोष कुमार, विकी गायकवाड, शुभम मसराम, शुभम खोबरे, सुनील कुकुडकर आणि अनेक झाडीपट्टी कलाकारांचा बहारदार आर्केस्टा सुद्धा निःशुल्क प्रवेशाने आयोजित करण्यात आलेला आहे. याचा आस्वाद जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मुल येथील तिरंगा समिती द्वारे करण्यात आले आहे.







