Homeकृषीशेतकऱ्यांचे डिमांड कायम ठेवत कृषी पंपांना वीज जोडणी द्या!

शेतकऱ्यांचे डिमांड कायम ठेवत कृषी पंपांना वीज जोडणी द्या!

शेतकऱ्यांचे डिमांड कायम ठेवत कृषी पंपांना वीज जोडणी द्या!

शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

लोकवाद दुर्योधन घोंगडे चंद्रपूर, दि.०१ – चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी पंपाच्या विद्युत जोडणीसाठी भरलेली डिमांडची रक्कम परत करण्याचे आदेश विद्युत विभागाने दिले आहेत. शेतकऱ्यांना संकटात टाकणारे हे आदेश असून याविषयाकडे विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना डिमांडची रक्कम परत न करता ती कायम ठेवून कृषी पंपाची विद्युत जोडणी द्यावी, अशी मागणी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना केली आहे.

कृषी पंपाच्या विद्युत जोडणीसाठी भरलेल्या डिमांडबाबत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत अनेक शेतकऱ्यांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देऊन विनंती केली आहे.

चंद्रपूर जिल्हा आदिवासी बहुल असून, वीज निर्मितीच्या क्षेत्रात राज्यातील अग्रणी जिल्ह्यांपैकी एक आहे. या जिल्ह्यात चं

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments