केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) मार्गदर्शनाखाली नागरी कृती कार्यक्रम आयोजित
प्रतिनिधी गडचिरोली; २८/०३/२०२५ रोजी, केंद्रीय राखीव पोलिस दलाने (CRPF) गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात येणाऱ्या बुर्गी गावात एक नागरी कृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९१ बटालियनचे कमांडंट श्री सत्यप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रमुख पाहुणे श्री राजीव रंजन (डेप्युटी कमांडंट), १९१ व्या बटालियनचे, श्री अमर सिंग गुर्जर (डेप्युटी कमांडंट), श्री आलोक यादव (असिस्टंट कमांडंट), ए/१९१ व्या बटालियनचे, समन्वय अधिकारी आणि डॉ. अनंतू एस. हे कार्यालयाची शोभा वाढविण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित होते. (सहाय्यक कमांड) वैद्यकीय अधिकारी १९१ वी बटालियन आणि श्री चेतन कदम (एसडीपीओ) एटापल्ली, डॉ. श्रुती बोदले प्राथमिक आरोग्य केंद्र, बुर्गी, बुर्गी मदत केंद्र प्रभारी पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ पुरी, धनराज कोळी सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य भगवान बिरसा मुंडाजी यांच्या पूजेने मालार्पन करून करण्यात आले.
या प्रसंगी, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९१ व्या बटालियनने बुर्गी, येमाली, उडेरा, मरकल, कांदोली, बिद्री, तातीगुंडम, कोंडावाही, मंगुटा, पैमा, करपणफुंडी, गोंडापुरी आणि अबनपल्ली येथील ग्रामस्थांना शालेय विद्यार्थ्यांना २५० सायकली, सौर दिवे, कॅरम बोर्ड, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट उपकरणे, शेतकऱ्यांना स्प्रे पंप इत्यादींचे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
एवढेच नाही तर ग्रामस्थांच्या आरोग्याची तपासणी व्हावी या हेतूने बुर्गी येथील डॉ. श्रुती बोदले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करून त्यांची तपासणी सुद्धा केली आणि सरकारी योजनांची माहिती दिली. बुर्गी, येमाली, उडेरा शाळांमधील मुलांनी सांस्कृतिक आणि रंगारंग आदी कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आलेले होते. त्यावेळी शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ, पदाधिकारी, अधिकारी, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९१ व्या बटालियनने सर्व मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमा बदल कौतुक होत आहे.







