HomeBreaking Newsउन्हाची दाहकता वाढल्याने पक्षासाठी केली पाणपोई

उन्हाची दाहकता वाढल्याने पक्षासाठी केली पाणपोई

 उन्हाची दाहकता वाढल्याने पक्षासाठी केली पाणपोई

पर्यावरण प्रेमी नामदेव यांच्या स्तुत्य उपक्रम 

प्रतिनिधी कुनघाडा,  पक्षी हा निसर्ग मित्र आहे निसर्ग मित्रच नाही तर निसर्गाचा व पर्यावरणाचा महत्वपूर्ण घटक आहे. दिवसेंदिवस पक्षांचे अस्तित्व धोक्यात येवू लागलेले आहे कारण जंगलातील पाणवठे उन्हाळ्याच्या दिवसात आठलेले असतात त्याना प्यायला पाणी मिळत नाही परिणामी बरेच पक्षी पाण्याअभावी मरण पावतात काही पक्षी उन्हाळयात जीथे पाणी आणि चारा मिळते अशा ठिकाणी ते वास्तव करीत असतात.

पक्षी वाचवणे आज काळाची गरज निर्माण झाली आहे याची जान ठेऊन कुनघाडा रै. येथील पर्यावरण प्रेमी नामदेव तुळशिराम वासेकर यांनी वन्यजीवाविषयी आपुलकी दाखुन स्वंत: लावलेल्या वूक्षावर पक्षासाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी घरीच झाडावर पाणपोई व सोबतच चार्याची सोय केली आहे नामदेव वासेकर गेल्यां आठ वर्षापासुन घराच्या समोर..लावलेली झाडे आंबा , आंवळा , रीठा, बेल, जाबुळ, सिसम, जांब, लिंबु, चिकू, बदाम, जास्वद, असे विविध प्रजातिच्या झाडाची लागवड करुन झांडाना पाणी देवुन लहाणांचे मोठे केले आहे. त्याच झाडावर अनेक प्रकारचे पक्षी येवुन मनसोक्त राहतात. एवढेच नाही तर माकडे सुधा झाडांवर येऊन आंबे खात मनमुराद उडी घेत असतात.

”  माझ्या घराच्या समोर काही चिमण्यांनी घरटे तयार केले आहे या झाडावर पक्षासाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या माझ्या उपक्रमाचे इतरही युवकांनी अनूकरण करावे हा माझा उदेश आहे. नामदेव वासेकर  पर्यावरण प्रेमी कुनघाडा रे.”

पर्यावरण वण्यजिवाचे अनन्यसाधातण महत्व आहे.  उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने पाणवठे कोरडे पडलेले असतात पक्षांना पिण्याचे पाणी मिळत नाही ही बाब लक्षात घेत नामदेव वासेकर यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम चालवले आहे या अंतर्गत त्यांने स्वताच्या घराच्या समोरील परीसरात विस – पंचविस झाड़े लावून झाडावर चारा व पाण्यांची सोय केली आहे यातुन त्यांने वण्यजिवाविषयी प्रेम व्यक्त केले आहे… तर युवकांनी सदर बाबीचे अनुकरण करीत पुढाकार घ्यावा असे आवाहनही केले आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments