HomeBreaking Newsनिर्माणाधिन पुलीयाच्या खोल खड्ड्यात दुचाकीने पडून दोघांचा अपघाती मृत्यू -चिंतलधाबा येथील घटना;

निर्माणाधिन पुलीयाच्या खोल खड्ड्यात दुचाकीने पडून दोघांचा अपघाती मृत्यू -चिंतलधाबा येथील घटना;

निर्माणाधिन पुलीयाच्या खोल खड्ड्यात दुचाकीने पडून दोघांचा अपघाती मृत्यू -चिंतलधाबा येथील घटना; 

पोंभूर्णा lokwad.in :- तालुक्यातील गंगापूर (नवीन) येथील दोघे मित्र दि.२८ फेब्रुवारीला रात्री नऊ वाजताच्या दरम्यान करंजी येथील साक्षगंध कार्यक्रम आटोपून दुचाकीने गावाकडे परत येत असताना चिंतलधाबा गावाजवळील निर्माणाधिन पुलीयावरून खाली पडून दोघा मित्रांचा मृत्यू झाला.संजय धर्माजी भंडारे वय (६५), मनोहर सुकन सोपनकार वय (६५) दोघेही रा.गंगापूर (नविन) असे मृतकाचे नाव आहे.सदर घटना दि.१ मार्चला सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.मृतक दोघेही बालपणापासूनचे मित्र असून दोघेही एकाच गावातील आहे.त्यांच्या मृत्युने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोंभूर्णा आक्सापुर रस्त्यावर चिंतलधाबा गावानजीक नवीन  पुलियाचे बांधकाम सुरू आहे. दि. २८ फेब्रुवारीला रात्री  अंदाजे ८:३० वाजताच्या सुमारास करंजी येथील साक्षगंधाचे कार्यक्रम आटोपून दुचाकीने क्र.(एम.एच.३४ बि.डी.२३१०) गावाकडे परत येत असताना दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने चिंतलधाबा गावाजवळील निर्माणाधिन पुलीयाच्या खोल खड्डयात पडून मृत्यू झाला.दोघेही मृत अवस्थेत रात्रभर खड्डयात पडले असल्याची कुणालाच माहीती नव्हती.दि.१ मार्चला सकाळी गावकऱ्यांना दोघेही पुलीयाच्या खड्डयात पडून असल्याची माहिती मिळताच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच पोंभूर्णा पोलिस घटना स्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला असून दोघांचेही शव शवविच्छेदन करण्याकरिता पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.शवविच्छेदन करून दोघांचेही मृतदेह परिवाराकडे सुपुर्द करण्यात आले.घटनेचा पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहे. दोघा मित्रांचा अपघाती  मृत्यूने गावात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

निर्माणाधिन पुलीयाच्या खोल खड्ड्यात दुचाकीने पडून दोघांचा अपघाती मृत्यू -चिंतलधाबा येथील घटना;

पोंभूर्णा :- तालुक्यातील गंगापूर (नवीन) येथील दोघे मित्र दि.२८ फेब्रुवारीला रात्री नऊ वाजताच्या दरम्यान करंजी येथील साक्षगंध कार्यक्रम आटोपून दुचाकीने गावाकडे परत येत असताना चिंतलधाबा गावाजवळील निर्माणाधिन पुलीयावरून खाली पडून दोघा मित्रांचा मृत्यू झाला.संजय धर्माजी भंडारे वय (६५), मनोहर सुकन सोपनकार वय (६५) दोघेही रा.गंगापूर (नविन) असे मृतकाचे नाव आहे.सदर घटना दि.१ मार्चला सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.मृतक दोघेही बालपणापासूनचे मित्र असून दोघेही एकाच गावातील आहे.त्यांच्या मृत्युने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोंभूर्णा आक्सापुर रस्त्यावर चिंतलधाबा गावानजीक नवीन  पुलियाचे बांधकाम सुरू आहे. दि. २८ फेब्रुवारीला रात्री  अंदाजे ८:३० वाजताच्या सुमारास करंजी येथील साक्षगंधाचे कार्यक्रम आटोपून दुचाकीने क्र.(एम.एच.३४ बि.डी.२३१०) गावाकडे परत येत असताना दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने चिंतलधाबा गावाजवळील निर्माणाधिन पुलीयाच्या खोल खड्डयात पडून मृत्यू झाला.दोघेही मृत अवस्थेत रात्रभर खड्डयात पडले असल्याची कुणालाच माहीती नव्हती.दि.१ मार्चला सकाळी गावकऱ्यांना दोघेही पुलीयाच्या खड्डयात पडून असल्याची माहिती मिळताच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच पोंभूर्णा पोलिस घटना स्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला असून दोघांचेही शव शवविच्छेदन करण्याकरिता पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.शवविच्छेदन करून दोघांचेही मृतदेह परिवाराकडे सुपुर्द करण्यात आले.घटनेचा पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहे. दोघा मित्रांचा अपघाती  मृत्यूने गावात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments