*माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल येथे संविधान दिवस उत्साहात साजरा*
अशफाक सय्यद प्रतिनिधी; माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल येथे संविधान दिवस २६/११ रोज मंगळवार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
त्यावेळी कार्यक्रमासाठी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका रिमा कांबळे. उपमुख्याद्यापक अशपाक सय्यद आणि ज्युनिअर कॉलेज इन्चार्ज दुष्यंत गणवीर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सवित्राबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार व मालअर्पण करण्यात आले. विद्यार्थ्यानी संविधान प्रस्ताविकाचे तिन्ही भाषेत वाचन केले. त्यानंतर विद्यार्थ्याची शहरात प्रभात फेरी काढून संविधानपर गीत आणि संविधान दिन चिरायू हो, बाबासाहेबांचा विजय असो, संविधान आमच्या हक्काचे, असे अनेक घोषणा देत समाजात जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन भूपेंद्र मोटघरे यांनी तर आभारप्रदर्शन सौरभ गेडाम यांनी केले. कार्यक्रमाच्या ययशस्वीते साठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.







