Homeचंद्रपूररांगोळी साकारून मतदान करण्याचा संदेश

रांगोळी साकारून मतदान करण्याचा संदेश

रांगोळी साकारून मतदान करण्याचा संदेश

मूल येथील आधार केंन्द्र व सेतू केंन्द्र तहसील कार्यालय मूल जागृतीसाठी उपक्रम

बल्लारपरू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने मतदानाचा टक्का वाढण्यासाठी विविध उपक्रम राबवून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. मूल येथील आधार केंन्द्राच्या संचालीका वैशाली चूनारकर ,पराग खोब्रागडे तसेच आधार सूपरवायझर आरती पांडे, मयूरी रामटेके,आरती बंडीवार,खूशी,कोमल हजारे,सेतू केंन्द्रातील गजू रायपूरे संचालक,पराग खोबा्रगआॅपरेटर विवेक मुनगेलवार, मतदान करण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

“मतदान हा आपला अधिकार आहे, तो आपण पार पाडला पाहिजे’ असा संदेश देत मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत शाळा, विविध संस्था, संघटना प्रयत्न करत आहे. मूल येथील आधार केंन्द्र व सेतू केंन्द्र नेही मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी पाऊल उचलले आहे. मतदान करण्यासाठी विविध प्रकारे नागरिकांना प्रोत्साहीत केले जात आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. तसेच मार्गदर्शन केले जात आहे.

दिवाळी व इतर सण-उत्सवाच्या काळात रांगोळी काढून विविध शासकीय उपक्रमासंदर्भात तसेच विविध योजनांबाबत माहिती देत असतात. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून विविध कार्यक्रमप्रसंगी रांगोळी साकारून त्या मतदान करण्याचा संदेश देत आहेत. याच अनुषंगाने त्यांनी गुरूवार, दि. 14 नोव्हेंबर रोजी आपल्या तहसील कार्यालयातील आधार केंन्द्र व सेतूच्या समोर रांगोळी साकारून “विधानसभा निवडणुकीत आपले मतदान हे मोलाचे आहे’, “एक दिवस मतदानासाठी लोकशाहीच्या हितासाठी’, “आपल्या मताचे दान, आहे लोकशाहीची शान’, “माझे मत माझा अधिकार, अशा संदेशाच्या माध्यमातून नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहीत करणारी रांगोळी साकारली. मूल तहसील मध्ये येणा—या नागरीकांना कडून उपक्रमाचे कौतूक होत आहे.

नागरिकांकडून कौतुक आधार केंन्द्राच्या आॅफरेटर कडून जनजागृतीपर उपक्रम राबवले जातात. याच मालिकेत आता मतदानासाठी जनजागृती केली जात आहे. मतदानासाठी करण्यात येणाऱ्या जनजागृतीच्या प्रयत्नांना नागरिकांचा प्रतिसादही मिळत आहे. मूल येथील तहसिलदार मृदुला मोरे यांनी उपक्रमाची प्रशांसा केली तसेच नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments