महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंह रावत यांच्या प्रचारार्थ पोंभूर्णा येथे विराट जाहीर सभा
अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती
सुभाष घोंगडे पोंभूर्णा, महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंह रावत यांच्या प्रचारार्थ विराट जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार महाराष्ट्र राज्य, सामाजिक कार्यकर्ता चंदु पाटील मारकवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष बल्लारपूर, घनश्याम मूलचंदानी , शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा) संदीप गिऱ्हे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष (शरद पवार गट) राजेंद्र वैद्य , जिल्हाध्यक्ष (शरद पवार गट) बेबीताई उईके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , आम आदमी पार्टी (विधानसभा प्रमुख) नागेश्वर गांडलेवार , मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर प्रा.दिलीप चौधरी , आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बल्लारपूर पवन भगत , देवाडा चे सरपंच विलास मोगरकर , ओबीसी सेल प्रदेश महासचिव काँग्रेस गुरुदासजी चौधरी यांचे प्रमुख मार्गदर्शनात होणार आहे. ही सभा दिनांक:-११/११/२०२४ सोमवारला दुपारी ४.०० वाजता किरण राईस मिलच्या भव्य पटांगणात पोभुंर्णा येथे संपन्न होणार असून या सभेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.







