जनसेवेच्या हकासाठी यावा सुधिर म्हणत….
एक टर्म ‘भाऊ’ हवाच जनतेची आर्त हाक !
दुर्योधन घोंगडे, मुल/ पोंभुर्णा/चंद्रपूर, मुख्य संपादक, लोकवाद (www.lokwad.in) मो. 9881197843
नाम. सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. शिवाय अनेक वर्ष ते चंद्रपूरचे पालकमंत्री राहिले आहेत. ते मुल-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार झाले. त्यांना फडणवीसांच्या मतदारसंघात अर्थमंत्र्यांसारखं महत्वाचं खातंही मिळालं. शिवाय एक अभ्यासू व्यक्तीमत्व अशी मुनगंटीवारांची ओळख असुन त्यांची मतदारसंघातील पक्ष संघटनेवरही पकड आहे. शिवाय जन सामान्याचा नेता नव्हे तर समाजात – कुटुंबातील एक सदस्य म्हनुन नावारुपास आलेला व दिलेला सब्द पुर्ण करणारा लोकभिमुख नेता अशी सर्वत्र ख्याती आहे.
मोदी विरोधी लाट, शेतकरी, शेतमजुरांची नाराजी, बहुजन, दलित व मुस्लीम समाजाची विरोधात गेलेली गठ्ठा मते, महागाई, बेरोजगारीसोबतच संविधान बदलाचा घरोघरी झालेला प्रचार यामुळेच कोट्यावधींची विकास कामे करूनही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपुरचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा २ लाख ६० हजार मतांनी पराभव झाला. मुनगंटीवार यांचा पराभव भाजपसाठी चिंता व चिंतनाचा विषय ठरला, विधानसभा निवडणुकीतील वातावरण आणि लोकांमधील चर्चा सहाजीकचं भाऊंचा ‘पराभव’ विसरणारी ठरत आहे. यात मान. खासदार यांची निवडणुक विजयानंतरची मुल- बलारपुर क्षेत्रातील नागरिकांना होणारी दुर्मिळ भेट, बेताल वक्तव्य आपसुकचं विधानसभा निवडणुकीत आपलाच असावा म्हणत भाऊची आठवण करतानांच्या चर्चा होत आहेत.
म्हणतात नां, ‘झाले गेले, विसरुन जावे पुढे पुढे चालावे’ या युक्तिप्रमाने विधान सभेचाच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राचा आर्थिक, सामाजिक, मानसिक, शारिरीक, शैक्षणिक, आदि परिपुर्ण विकास व्हावा हा ध्यास घेत सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी आपला रथ चालु ठेवला आहे. भाऊ लोकप्रिय अभ्यासू नेते आहेतच शिवाय त्यांच्या कामाची धडाडी सुद्धा सर्वश्रूत आहे. गेल्या साडेसात वर्षात त्यांनी जिल्ह्यात कोट्यावधींची विकासकामे केली. केंद्रीय सैनिक शाळा, एसएनडीटी विद्यापीठ, बॉटनिकल गार्डन, वन अकादमी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कॅन्सर हॉस्पिटल, अमृत पाणीपुरवठा योजनेपासुन अनेक छोटी-मोठी विविध शेकडो विकास कामे केली आहेत. त्यांच्या कामाचा धडाका पाहून लोकसभेत विसर पडलेल्यांना आता पुन्हा ‘जनसेवेसाठी यावा सुधीरभाऊ….’ अशीच अवस्था झालेली सर्वत्र दिसत असुन सुधीरभाऊ सारखे नेते नाही मनत भाऊ एक टर्म हवाच ! हीच हाक सर्वश्रुत सुरु आहे. विकासासंबंधी आजवर जो शब्द सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला दिला तो प्राधान्याने पूर्ण केला आहे म्हणूनच शब्दाला जागणारा नेता अशी त्यांगची राज्यभर ख्याती आहे.
मुल तालुक्यात विविध लोकोपयोगी विकासकामे हाती घेत घेत मुख्य रस्ते, पाणीपुरवठा योजना, स्टेडियम, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, कन्नमवार सभागृह, मुल सुशोभित बस स्थानक व सोबतच डेपो, सुशोभित असे आठवडी बाजार, असे एक नाही तर अनेक छोटे मोठे कामे गाव खेड्यांचा विकास विविध समाजाकरीता रस्ते नाल्यासह सभागृह, क्रिडांगन, जिम, सहित्य, वाचनालये पुस्तके, उथळपेठ या छोट्याश्या भाऊंच्या दतक गावाकरिता भव्य दिव्य असे अमेरिका देशाच्या धरतिवर व्हाईट हाऊस प्रमाने २.५० करोड रुपयाचे वाचनालय ग्रामपंचायत ची मोठी एमारत तसेच शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, कृषी महाविद्यालय, महिलांच्या पंखांना बळ देणारे सर्वोत्कृष्ठ शुरवी महाविद्यालय यासारखे मोठे प्रकल्प उभे करण्याचा मानस आहे. मुल तालुक्याचा व तालुक्यातील प्रतेक गावाचा चेहरा-मोहरा बदलविण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे अविरत ‘अहो रात्र न थकता व थांबवता’ स्वत =च्या आरोग्याची पर्वा न करता हसत मुखाने सर्वांगिण विकासातुन मुल हा तालुका महाराष्ट्रात अव्वल करण्याच्या दृष्टीने कार्य करित आहेत.
मुल नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांच्या आढावा बघता ‘देशाला संविधान अर्पण होऊन ७४ वर्षे पूर्ण झाली असुन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दायित्व, कर्तव्य व जबाबदाऱ्या संविधानामध्ये लिखीत स्वरूपात देशाला दिल्या. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष असतांना मुलचा गौरव वाढावा म्हनुन ‘छत्रपती शिवाजी महाराज व व्यापार संकुलाची निर्मिती’ करण्यात आली असुन संकुलाची उभी वास्तु मोठ्या दिमाखात मुख्य मर्गावरुन मार्गक्रमण करतांना येनाऱ्या जनकार्याचे लक्ष वेधुन घेत अनेकांना रोजगार देत आहे.
मुल तालुक्यतिल भाउंचा एक अनुभव :- ‘सर्वप्रथम जेव्हा स्व. दिलीप पारधी यांच्यासमवेत मुल येथे आठवडी बाजार बघण्यासाठी आलो. तेव्हा चिखल, कच्चा रस्ता व घाणीचे साम्राज्य होते. आता या ठिकाणी सुसज्ज अशा आठवडी बाजाराची निर्मीती करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले या नावाने हे आठवडी बाजार सेवेसाठी लोकार्पित करीत आहे. महात्मा फुलेंनी ‘शेतकऱ्यांचा आसुड’ हे पुस्तक लिहून शेतकऱ्यांसाठी असलेला भाव व्यक्त केला. हा बाजार येथील शेतकरी बांधवासाठी निश्चितच सेवा देईल,’ असा विश्वास मंत्री मुनगंटीवार यांना आहे.
भोई समाजाच्या नागरिकांची प्रवेशद्वाराची निर्मिती व्हावी यासाठी मागणी होतर त्यावरुन महर्षी वाल्मिकीच्या नावाने मुख्य रस्त्यावर प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. सदर प्रवेशद्वारासाठी ५० लाख रुपये मंजूर केले. मात्र, जागेअभावी २५ लाख रुपये खर्च करून गेटची निर्मीती झाली. या प्रवेशद्वारातून जातांना महर्षी वाल्मिकीचे स्मरण निश्चितच होतो तसेच शिल्लक २३ लाख रुपयात श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने दुसरे अटल गेट लवकरचं उभारण्यात येणार आहे.
‘दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर मुख्य रस्त्यावर शहीद स्मारकाची (म्युरल ) निर्मिती करण्यात आली. या स्मारकामध्ये शहीद भगतसिंगाची प्रतिकृती आहे. स्वातंत्र्यासाठी ‘मेरा रंग दे बसंती चोला’ म्हणत भगतसिंग हसत-हसत फासावर गेले. ते स्मारक येथील तरुण-तरुणींच्या आयुष्याचे उद्दिष्ट ठरवेल, यात कवडीची ही शंका नाही. या तरुणांमध्येही देशासाठी काही करावयाचे आहे, हा भाव निर्माण होईल,’ या उदांत हेतुने येथे सुधीरभाऊंच्या प्रयत्नाने ‘म्युरम’ उभे आहे. मुल बलारपुर विधानसभा क्षेत्राचा विकासाचा पाढा वाचयला खुप मोठा असुन क्षेत्राला ‘असा नेता मिळने कठिन म्हनत जनतेच्या क्षेत्राच्या विकासाकरिता भाऊ एकदा याचं…!’ हीच आर्त हाक जनतेमधुन ऐकायला मिळत आहे.*जनसेवेच्या हकासाठी यावा सुधिर म्हणत…*







