हजारो कुटुंबियांच्या आशीर्वादाने आमदार भांगडिया यांनी भरला नामांकन
प्रमोद राऊत चिमूर
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, दिनांक २२ ऑक्टोंबर २०२४ पासुन उमेदवारीचे नामांकन दाखल करणे सूरु झाले आहे. यातच आज चिमूर विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार बंटी भांगडिया यांनी दि. २४ ऑक्टोंबर २०२४ ला सकाळी १० वाजताच्या दरम्यान आपला उमेदवारी अर्ज नेहरू विद्यालयाच्या पटांगणातून मोठया प्रमाणात बैलबंडीवरुन महारॅली काढत उपविभागीय अधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी किशोर गाडगे यांच्याकडे नामांकन दाखल करण्यात आल.
नेहरू विद्यालयाच्या भव्य पटांगणतून वाजत गाजत, गोंडी नृत्य, भजन अश्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या कलाभूषात हजारो संख्येच्या महीला, पुरुषांच्या उपस्थितीत लक्षवेधक अशी महारॅली काढण्यात आली होती. यावेळी नामांकन भरताना आमदार बंटी भांगडिया म्हणाले की, हजारो हजारो कुटुंबियांच्या आशीर्वादाने आज मी चिमूर विधानसभा क्षेत्रांतील उमेदवारीचा नामांकन उपविभागीय अधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी चिमूर यांच्याकडे दाखल केला. मला माझ्या विधानसभा क्षेत्रांतील असलेल्या कुटुंबियातील सदस्यावर विश्वास आहे. की, पुनः मला या विधानसभेच्या असलेल्या उर्वरीत विकास कामे शिक्षण, आरोग्य, सिंचन, गाव तेथे वाचनालय, चिमूर क्रांती भूमीत रेल्वे असे अधिक विकास कामे करण्यासाठी मला निवडून देत विजयाची माळ माझ्याच गळ्यात टाकतील. असा आशावाद ठेवत हजारो कुटुंबीयांचा आशीर्वाद घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनु जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणुक संचालन समिती महाराष्ट्र राज्य अशोक नेते, माजी विधान परिषद सदस्य मितेश भांगडिया, श्रीकांत भांगडिया, भाजपा नेते तथा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, प्रकाश देवतळे, निलम राचलवार, भाजपा तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, रडके, आवेश पठाण, एकनाथ थूटे, भाजपा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिलीप शिवरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र मोटघरे, भाजयुमोचे समीर राचलवार, श्रेयस लाखे, बंटी वनकर, यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच चिमूर विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, शेतमजुरासह हजारो महीला, पुरुष उपस्थित होते.







