HomeChimurशिक्षकभारतीचे जिल्हा अध्यक्ष भास्कर बावणकर यांनी दिव्यवंदना मधील मनोरुग्णासोबत केला...

शिक्षकभारतीचे जिल्हा अध्यक्ष भास्कर बावणकर यांनी दिव्यवंदना मधील मनोरुग्णासोबत केला वाढदिवस साजरा

शिक्षकभारतीचे  जिल्हा अध्यक्ष भास्कर बावणकर  यांनी दिव्यवंदना मधील मनोरुग्णासोबत केला वाढदिवस साजरा

मनोरुग्ण यांना कपडे व फळ केले वाटप .

प्रमोद राऊत चिमूर ;  येथील सामाजिक क्षेत्रात वावरणारे, शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष भास्कर बावणकर यांनी आपला वाढदिवस दिनांक १७ ऑक्टोबर जामगांव येथील दिव्यवंदना मनोरुग्ण कॅम्प मध्ये मनोरुग्णांच्या उपस्थितीत व राजु नामक मनोरुग्ण च्या हस्ते केक कापून साजरा केला .

भास्कर बावणकर यांनी आपल्या कुटुंब सोबत त्यात वडील श्री लक्ष्मणराव बावणकर, पत्नी सौ. भारती बावणकर (मुख्याध्यापिका जिप माध्यमिक शाळा भटाळा ता. वरोरा ), मुले तसेच मित्र शिवकुमार शिंदे परिवार मधील  पत्रकार कलीम शेख, इम्रान कुरेशी, रामदास हेमके व दिव्य वंदना फाउंडेशन संस्थापक शुभम पसारकर यांच्या उपस्थितीत भावनिक व उत्साहात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. दरम्यान मनोरुग्ण यांना कपडे व फळ अल्योपोहार वाटप करण्यात आले.

चिमूर येथील अनेक वर्ष राहत असलेल्या राजु नामक मनोरुग्णाचे बदलते जीवन चित्र बघून भावनिक झाले. मनोरुग्णानी डान्स केले असता तो क्षण न आवरत भास्कर बावणकर यांनी डान्स करीत मनोरुग्णाच्या आनंदात आनंद घेतला.

दिव्य फाउंडेशन संस्थापक शुभम पसारकर आणि त्यांचे स्टॉप यांनी भास्कर बावणकर यांचे व त्यांचे सोबत उपस्थित्यांचे सन्मान करीत स्वागत केले.शुभम पसारकर यांच्या मनोरुग्ण सेवेच्या व्रत कार्यास सलाम देत शुभेच्छा भास्कर बावणकर यांनी दिल्या.शिक्षकभारतीचे जिल्हा अध्यक्ष भास्कर बावणकर यांनी दिव्यवंदना मधील मनोरुग्णासोबत केला वाढदिवस साजरामनोरुग्ण यांना कपडे व फळ केले वाटप .

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments