Homeमहाराष्ट्रधुळेपल्ली गावातील वीज वीजपुरवठा आठवडाभरात सुरळीत करा

धुळेपल्ली गावातील वीज वीजपुरवठा आठवडाभरात सुरळीत करा

धुळेपल्ली गावातील वीज वीजपुरवठा आठवडाभरात  सुरळीत करा 

कॉ. सचिन मोतकुरवार यांनी दिला आंदोलनाचा इशारा

गडचिरोली महेश वासेकर,:

एटापल्ली तालुक्यातील धुळेपल्ली गावात मागील तीन महिन्यांपासून वीजपुरवठा बंद असून, यामुळे गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) चे कॉ. सचिन मोतकुरवार यांनी या समस्येबाबत महावितरण विभागाला आठवड्याभरात वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. जर वेळेत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अन्ना वस्त्र निवारा आरोग्य पाणी यासह वीज हीसुद्धा मूलभूत गरज झाली असून विजे वीणा कोणतेही काम होणे दुरापास्त झाले आहे. अगोदरच्या काळात गावा गावात रॉकेल मिळायचे त्यामुळे आदिवासी गरीब लोक मजबुरीने दिव्यात काळ काढायचे परंतु आधुनिकीकरनात शासनाने नागरिकांना मागेल त्याला आणि पाहिजे तिथे वीज पुरवठा केले असल्याने विजेची सवय झालेली आहे आणि राकेलं मिळेने कठीण झाले आहे. त्यामूळे पावसाच्या दिवसात तेही जंगली भागात झाडे झुडूप गवत त्यातील हिंस्र प्राणी साप विंचू या एक ना  अनेक समस्येने भागातील नागरिकांचे जीवन अंधकारमय झाले असून दिवस काढायचे कसे हाच मोठा प्रश्न धुळेपळी गाव वाशियांवर पडला आहे.  अंधारात वीजे अभावी शेतकाम, शेतीला पाणी , पिण्याचा पाण्याचा पाणीपुरवठा, संपर्क करिता मोबाईल अभ्यासाकरिता विद्यार्थ्याणा वीज अस्या नाना विध दैनंदिन जीवनातील अनेक मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत वितरण कंपनीकडे वारंवार तक्रारी करूनही महावितरण विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकात तीव्र नाराजी पसरली असून CPI चे नेतृत्वात तात्काळ वीजपुरवठा सुरळीत न केल्यास वीज वितरण विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

यावेळी कॉ. सुरज जक्कुलवार, दलसू गावडे, सुरेश मिंज, रमेश कुजूर, जयराम लकडा, दिनेश गावडे, रमेश गावडे, विष्णू तिरकी, बिरबल मिंज, रामजीत कुजूर, अरविंद मिंज आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या गंभीर बाबीकडे वीज वितरण कंपनी लक्ष घालणार का याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments