HomeBreaking Newsचिमूर तालुका काँग्रेस कमिटीचा गौतमी पाटील कार्यक्रमाशी काही संबंध नाही

चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचा गौतमी पाटील कार्यक्रमाशी काही संबंध नाही

चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचा गौतमी पाटील कार्यक्रमाशी काही संबंध नाही 

चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचा पत्रकार परिषदेत खुलासा 

प्रमोद राऊत चिमूर

चिमूर क्रांती भूमीत उद्या दिनांक ९ ऑक्टोंबर २०२४ ला गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांचे आयोजन चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे आयोजन कऱण्यात आलेले नसून चिमूर तालुका काँग्रेस कमिटीशी कोणताही संबंध नाही असा खुलासा चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित तालुका काँग्रेस कमिटीने सांगितले.

चिमूर तालुक्यात काँग्रेस पक्षाचे अंतर्गत वाद होते. मात्र आता दिवसेंदिवस वाद चव्हाट्यावर येत असल्याचे गौतमी पाटील यांच्या घेतलेल्या कार्यक्रमाप्रसंगी दिसून येत आहे. नवरात्री उत्सव निमित्याने चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशनच्या वतीने प्रसिद्ध डान्स कलावंत गौतमी पाटील यांचा कार्यक्रम उद्या दिनांक ९ ऑक्टोंबर २०२४ ला चिमूर – भिसी मार्गावर असलेल्या ग्रामगीता महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमांचे आयोजन चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन हे असून, कार्यक्रमांचे अध्यक्षपासुन ते प्रमूख पाहुणे पर्यंत काँग्रेस पक्षाचे आमदार, खासदार, तथा तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व ज्येष्ठ सेवादलचे पदाधिकारी आहेत. मात्र या चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्या सोबत या गौतमी पाटीलच्या आयोजन केलेल्या कार्यक्रमाशी संबंध नाही. तसेच आम्ही कोणी चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. अशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

सदर पत्रकार परिषदेत चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके, ज्येष्ठ सेवादलचे पदाधिकारी राम राऊत, शहर अध्यक्ष अविनाश अगडे, विजय डाबररे, आरिफभाई शेख, विवेक कापसे, राजू चौधरी, पप्पू शेख, श्रीकांत गेडाम, रामदास विठाडे, नामदेव डोये आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस कमिटीचा कार्यक्रम नसून मी चिमूर तालुका काँग्रेस कमिटीशी सहमत आहे.

धनराज मुंगले, प्रदेश संघटक ओबीसी विभाग

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments