🔴 गॅस टंचाईविरोधात मूलमध्ये धरणे आंदोलन; जनतेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
मूल प्रतिनिधी : शहरासह संपूर्ण तालुक्यात वाढत्या गॅस सिलेंडर टंचाईमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मुल तालुक्यात एकही अधिकृत गॅस एजन्सी नसल्याने तसेच पुरवठ्यातील तांत्रिक अडचणींमुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिला काँग्रेसतर्फे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संतोषसिंह रावत तसेच मुल शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष सौ. एकता ताई समर्थ यांच्या नेतृत्वात गुरुवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता गांधी चौक, मूल येथे हे आंदोलन होणार आहे.
या आंदोलनात गॅस टंचाई, वितरणातील अडथळे आणि नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीच्या विरोधात आवाज उठवण्यात येणार आहे. “आपल्या न्याय हक्कासाठी आणि सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन मुल तालुका काँग्रेस कमेटी, नगर परिषद पदाधिकारी, नगरसेवक तसेच बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
तसेच ज्या नागरिकांना गॅस सिलेंडर संदर्भात अडचणी येत आहेत, त्यांनी उद्या सकाळी १० वाजता काँग्रेस भवन, मूल येथे उपस्थित राहावे, अशी विनंती महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आली आहे.
👉 या आंदोलनाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, प्रशासन यावर काय तोडगा काढते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.







