HomeBreaking Newsमूल आगारातून नागपूरसाठी एसटी बसची मागणी; युवकांचा आंदोलनाचा इशारा

मूल आगारातून नागपूरसाठी एसटी बसची मागणी; युवकांचा आंदोलनाचा इशारा

मूल आगारातून नागपूरसाठी एसटी बसची मागणी; युवा क्रांती संघटनेचा आंदोलनाचा इशारा 

दुर्योधन घोंगडे लोकवाद नागपूर  :मूल आगारातून नागपूरसाठी थेट एसटी बस सेवा सुरू करण्याची मागणी सध्या युवकांमध्ये जोर धरताना दिसत आहे. विशेषतः चंद्रपूर–मूल–नागपूर, पोंभुर्णा–मूल–नागपूर तसेच गडचिरोली–चामोर्शी–मूल–नागपूर या मार्गांवर एसटी बस सुरू करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
याबाबतचे निवेदन युवा क्रांती संघटनेचे संस्थापक निखिल वाढई, अध्यक्ष प्रणित पाल, सचिव निहाल गेडाम तसेच कार्यकर्ते सुजित खोब्रागडे, हर्षवर्धन दुपारे, धनराज चिमुलवार, सुमेश दुपारे आदींनी संबंधित विभागाला सादर केले आहे. तसेच, या मागणीची दखल न घेतल्यास मूल बसस्थानक परिसरात आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मूल तालुक्यातून सध्या मोठ्या प्रमाणात खाजगी ट्रॅव्हल्स बसेस धावत आहेत. दर अर्धा ते एक तासांनी या बसेस प्रवाशांनी फुल भरून निघतात. मात्र, अनेक वेळा खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तन केल्याच्या तसेच जादा दर आकारल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.
नागरिकांच्या मते, जर राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) या मार्गांवर नियमित बस सेवा सुरू केली, तर प्रवाशांना सुरक्षित, परवडणारी आणि विश्वासार्ह सेवा मिळेल. त्याचबरोबर महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते.
👉 त्यामुळे लवकरात लवकर एसटी बस सेवा सुरू करून प्रवाशांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.
lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments