Homeगडचिरोलीचामोर्शी–मुल मार्गावर रेतीने भरलेली ट्रॉली उलटली; सुदैवाने जीवितहानी टळली

चामोर्शी–मुल मार्गावर रेतीने भरलेली ट्रॉली उलटली; सुदैवाने जीवितहानी टळली

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

चामोर्शी: चामोर्शी- मुल मार्गावर आज दि. २५ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे १०:०० वाजताच्या सुमारास चामोर्शी–मुल मार्गावर चामोर्शी शहराजवळील सोनालीका शोरूम परिसरात रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याची घटना घडली. ट्रॉलीचे पट्टे तुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. ट्रॉलीमध्ये रेती भरलेली होती.घटनेनंतर काही काळ रस्त्यावर वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक जादा ट्रिपा मारण्यासाठी भरधाव वेगाने वाहतूक करत असतात. त्यामुळे अशा अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या प्रकाराकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments