Homeगडचिरोलीमाजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रादेशाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांचे चामोर्शी...

माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रादेशाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांचे चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात शहीद वीर बाबुराव शेडमाके यांची जयंती उत्साहात साजरी.

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

चामोर्शी : चामोर्शी येथे माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात शहीद वीर बाबुराव शेडमाके यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या देशभक्तीपूर्ण कार्यामुळे आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावी, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला दिलीपजी चलाख, साईनाथजी बुरांडे, विजयजी गेडाम, काशीनाथजी बुरांडे, दिपकजी वासेकर, लोमेशजी सातपुते, समर्थजी, सुनीलजी सोरते, स्थानिक कार्यकर्ते, नागरिक तसेच भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारावून गेले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन माजी आमदार तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments