राज्य राखीव पोलीस बल ( एस .आर.पी.एफ.) यांची वैरागड किल्ल्याला भेट.
गडकिल्ल्यांचे अस्तित्व टिकवणे ही आपली जबाबदारी. सहाय्यक समादेशक मारोती लांबेवार
वैरागड (वार्ताहर): राज्य राखीव पोलीस बल यांच्या 78 व्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून गड किल्ला भेटीच्या निमित्ताने राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 विसोरा यांनी समादेशक राज्य राखीव पोलीस बल नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनात दिनांक 11 मार्च 2026 रोजी वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्याला भेट देण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन या कार्यक्रमात सहाय्यक समादेशक मारोती लांबेवार अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वैरागड च्या सरपंच संगीता पेंदाम, उपसरपंच भास्कर बोडने, नियोजन विभाग नागपूरचे डॉक्टर सुशील आगरेकर, नियोजन विभाग गडचिरोलीचे ज्ञानेश्वर खडतकर, सहाय्यक समादेशक ललित मिश्रा, पोलीस निरीक्षक मधुकर मोरला, पोलीस उपनिरीक्षक विकास वासनिक, कौन्स्टेबल महेश वासेकर, पोलीस पाटील गोरख भानारकर, रामदास डोंगरवार, प्रलय सहारे, मनोज खोब्रागडे, ग्रामपंचायत सदस्य आदेश आकरे, सत्यदास आत्राम, माजी पंचायत समिती उपसभापती विनोद बावनकर, पितांबर लांजेवार, गजानन धनकर, लालाजी आत्राम, हेड कॉन्स्टेबल संजय चिंतलवार विजय कावळे राहुल वरगट आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर मसराम यांनी केले कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळा वैरागड चे सर्व विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक तसेच गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.







