Homeमुलमूल येथे श्री स्वामी समर्थ महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन

मूल येथे श्री स्वामी समर्थ महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन

मूल येथे श्री स्वामी समर्थ महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन

मूल (प्रतिनिधी) :

मूल येथील हनुमान मंदिर तलाव पाळ परिसरात स्वामी समर्थ महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा श्री स्वामी समर्थ भक्तीसेवा समिती, मूल यांच्या वतीने मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे.

समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या जयंती सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवार दि. १९ मार्च रोजी सायंकाळी ६.०० ते रात्री १०.०० या वेळेत होणार आहे. शुक्रवार दि. २० मार्च रोजी सकाळी ८.०० वाजता अभिषेक व पूजा-अर्चना, दुपारी १२.०० वाजता पालखी मिरवणूक तसेच स्वामी समर्थ पादुका यांचे अभिषेक करण्यात येणार आहे. सायंकाळी ४.०० वाजता गोपालकालाचा कार्यक्रम तर त्यानंतर सहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी समितीचे अध्यक्ष नितीन येरेजवार, उपाध्यक्ष अशोक आपेकवार, सचिव विजय बढदे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. आयोजकांनी सर्व भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून जयंती सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments