चामोर्शी, :- तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसी करिता अधिग्रहित करू नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात, अशी मागणी पत्राद्वारे विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांच्याकडे कांग्रेस चे जिल्हाध्यक्ष महेंद्र बाम्हनवाडे यांनी केली होती.
या मागणीची दखल घेत आमदार अभिजित वंजारी यांनी विधान परिषदेत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहित करू नये तसेच जमीन अधिग्रहण करताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. याबद्दल आमदार अभिजित वंजारी यांचे शेतकरी संघटना व भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांनी मनःपूर्वक आभार मानले.