मूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार उत्साहात साजरी; महाप्रसाद, फळ वाटप व चित्रकला स्पर्धेचे आयोजन
शिवसेना तालुका प्रमुख राज ठाकरे यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक उपक्रम
मूल | प्रतिनिधी ; छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (तिथीनुसार) मूल शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेना कार्यालय, मूल येथे आयोजित कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
या निमित्ताने शिवसेना कार्यालयासमोर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच सरकारी दवाखाना, मूल येथे रुग्णांना फळांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. याशिवाय बालविकास प्राथमिक शाळा, मूल येथे इयत्ता ६ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता बुट्टे मॅडम तसेच शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
हा संपूर्ण कार्यक्रम शिवसेना तालुकाप्रमुख राजूभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी उपतालुका प्रमुख रवी शेरकी, शहर प्रमुख बादल करपे, आकाश कावळे, सरपंच अनिल सोनुले, इशू आईलानी, राकेश मोहुर्ले, शुभम अकेवार, चेतन मुंगमोडे, आशिष गुंडोजवर, दिलीप पाल तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
तसेच सौ. टीना ठाकरे ताई, कोठारे ताई व बोडखे ताई यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून सहभाग नोंदविला.







