Homeगडचिरोली२४ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा उत्साहात; दिवंगत मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली

२४ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा उत्साहात; दिवंगत मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली

२४ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा उत्साहात; दिवंगत मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली

दुर्योधन घोंगडे, लोकवाद : तब्बल २४ वर्षांनंतर स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेतील माजी विद्यार्थी, तथा शिक्षक यांचा स्नेह मिलन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. दीर्घ कालावधीनंतर एकमेकांना भेटण्याचा आनंद सहभागींच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत जुन्या आठवणींमध्ये रममाण झाले. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना अनेक विद्यार्थी भावूक झाले. काहींनी आपल्या यशस्वी प्रवासाच्या कथा सांगत, “शाळेचे संस्कार हेच आयुष्यातील खरे भांडवल आहे,” असे नमूद केले.

विशेष म्हणजे, जीवन प्रवासात ज्या वर्गमित्रांचे अकाली निधन झाले, त्यांना सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना वातावरण काही काळ गंभीर व भावूक झाले. उपस्थितांनी दिवंगत मित्रांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.

या स्नेह मिलन सोहळ्यात विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांची उपस्थिती विशेष ठरली. शिक्षकांनी मुलांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रम, मनोगते तसेच शिक्षक व काही माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यात अक्षय जगनाडे, गिरडकर, अंकुश सूर्यवंशी, अरविंद शेंडे, आशिष मनबत्तुलवार, भालचंद्र ठिकाणी, चंद्रकांत देशकर, चेतन सदमवार, धनराज तिवाडे, गणेश भोपे, इम्रान खान, इम्रान पठाण, जितेंद्र चौथाले, जितेश पराते, कार्तिक बोचर, क्षितिज वाळके, महेंद्र माणकीवार, मेहर कुन्नावर, मिलिंद अडकिने, मिमोह झाल्का, श्री. आखरे, नवनीत शेंडे, नीलेश कोठारे, नीलेश उरकुडे, पंकज शेंडे, प्रसाद वट्टमवार, प्रतीक येलंकीवार, प्रवीण बुटले, पुंडलिक भेंडारे, पुरुषोत्तम धोटे, पुरुषोत्तम कोटरंगे, राहुल नागोशेनोम, रामभाऊ गुरुणुले, रुपेश गणवीर, सचिन निकुरे, सचिन वाकुडकर, समीर मंथनवार, संदीप ढोरे, संदीप तेलंग, सतीश मोहरळे, स्नेहल पुस्तोडे, सोमनाथ झरकर, सुभाष माणकीवार, सुहास गेडाम, स्वप्नील आलगमवार, स्वप्नील चेपूरवार, उमेश मोहर्ले, विकास अनंतवार, अनुश्री रायकंतीवार, अर्चना लेंगुरे, प्रथम आशा, छाया टिकले, अज्योत्साना येडलावार, कल्पना बोबाटे, राहुल कोठेवार, कल्पना नवघडे, कांचन केकुलवार, करिश्मा साखरे, ललिता वाघाडे, लेना गेडम, मनिषा उईके, मेघा चिटमलवार, मीनाक्षी खोब्रागडे, गुलाबी जेंगते, प्रीती करमवार, प्रियंका कडुकर, रूपाली मोरे, संगिता माथनवार, सपना दिघोरे, सपना खोब्रागडे, शालिनी गुरुणुले, शिल्पा गेडम, शिल्पा रामटेके, श्वेता जजमवार, श्वेता शेंडे, सिमा रजा, स्मिता अबोजवार, स्वाती अष्टंकर, उर्मिला चौखुंडे, उषा नागोशे, उषा सोमणकर, वैशाली गरपल्लीवार, वर्षा भेंडारे, वर्षा पेंशनवार आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच घरोटे, खोब्रागडे, संगेल, शेंडे, वलके, गुरुणुले, चिंताडे मॅडम, उराडे सर, गायकवाड सर, भेंडारे, नागोसे मॅडम, आदी शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांचा शिक्षकांप्रती असलेला आदर व प्रेम पाहून “मन भरून आले,” अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी पुन्हा अशा भेटीगाठी नियमितपणे आयोजित करण्याचा संकल्प केला. २४ वर्षांनंतर झालेल्या या स्नेह मिलन सोहळ्यामुळे जुन्या मैत्रीचे बंध अधिक दृढ झाले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments