Homeगडचिरोलीचामोर्शी नगरपंचायतीच्या चार विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड काँग्रेसला राष्ट्रवादी व भाजपची...

चामोर्शी नगरपंचायतीच्या चार विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड काँग्रेसला राष्ट्रवादी व भाजपची साथ; नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला कार्यभार

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

चामोर्शी : चामोर्शी नगर पंचायत येथील विषय समिती सभापती पदांची मुदत संपल्याने २० फेब्रुवारी २०२६ रोजी नगरपंचायत सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची साथ लाभल्याने चारही विषय समिती सभापतींची निवड बिनविरोध पार पडली.
मागील वर्षी २० फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या निवडणुकीनंतर एक वर्षाची मुदत पूर्ण झाल्याने नव्या सभापतींची निवड करण्यात आली. आरोग्य व स्वच्छता, बांधकाम, पाणी पुरवठा व जलनिस्सारण तसेच महिला व बालकल्याण या समित्यांसाठी प्रत्येकी एक नामांकन अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अविरोध झाली.
पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अरुण एम. यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. यावेळी मुख्याधिकारी सुर्यकांत पिंदुरकर, अभियंता स्वप्नील पिंदुरकर, कर निरीक्षक सेहल दहिवले, लिपिक दिलीप लाडे यांची उपस्थिती होती.
निवडीनुसार काँग्रेसचे नगरपंचायत उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे यांची पाचव्यांदा स्वच्छता, वैद्यक व आरोग्य सभापतीपदी निवड झाली. बांधकाम सभापतीपदी वैभव भिवापूरे यांचीही पाचव्यांदा वर्णी लागली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे निशांत नैताम यांची चौथ्यांदा पाणी पुरवठा व जलनिस्सारण सभापती म्हणून निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण सभापतीपदी भाजपच्या रोशनी वरघंटे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या माधुरी व्याहाडकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
नवनिर्वाचित सभापतींनी पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षा जयश्री वायलालवार यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
याप्रसंगी नगराध्यक्षा जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, गटनेते नितिन वायलालवार, राहुल नैताम, गीता सोरते, सुमेध तुरे, आशिष पिपरे, सोनाली पिपरे, वर्षा भिवापूरे, प्रेमा आईंचवार, स्नेहा सातपुते, काजल नैताम, वंदना गेडाम यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
एकमताने झालेल्या या निवडीमुळे नगरपंचायतीतील सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये समन्वयाचे चित्र पाहायला मिळाले. आगामी काळात शहरातील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments