Homeगडचिरोली*धान खरेदी केंद्रातील गैरव्यवहार : केंद्रावर CCTV लावण्याची मागणी*

*धान खरेदी केंद्रातील गैरव्यवहार : केंद्रावर CCTV लावण्याची मागणी*

🌾 *धान खरेदी केंद्रातील गैरव्यवहार : केंद्रावर CCTV लावण्याची मागणी*

जिल्हा पणन अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी

गडचिरोली उपसंपादक : जिल्ह्यातील विविध धान खरेदी केंद्रांवर सुरू असलेल्या गैरव्यवहाराबाबत आज आजाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हा पणन अधिकारी यांना कायदेशीर मागण्यांसह निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हा पणन अधिकारी श्री. तिवाडे यांना घेराव घालून गंभीर बाबींवर चर्चा केली.

अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत धान ही अत्यावश्यक वस्तू असून साठेबाजी, दरकपात व गैरव्यवहार दंडनीय गुन्हा आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 (APMC Act) नुसार धान खरेदी प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध असणे बंधनकारक आहे. MSP धोरणाचे उल्लंघन करणे हे शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारे आहे. असे असताना केंद्रावर शेतकऱ्यांकडून उघड लूट चालू असल्याचा गंभीर आरोप आजाद समाज पक्षाने केला आहे.

निवेदनात खालील गंभीर मुद्दे मांडण्यात आले:

* अनधिकृत नोंदणी फी आकारली जात आहे – शासनाने कोणताही आदेश नसताना शेतकऱ्यांकडून पैसे वसूल.

* अनावश्यक हमाली व इतर कपाती – MSP दरावर परिणाम.

* इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर पारदर्शकता नाही.

* MSP योजनेचे उल्लंघन करून

* APMC कायद्याचे उल्लंघन – खरेदी प्रक्रिया पारदर्शक व अधिकृत पद्धतीने न करता नियम डावलले जात आहेत.

✊ पक्षाच्या ठोस मागण्या

🔹 सर्व धान खरेदी केंद्रांची स्वतंत्र चौकशी समितीमार्फत तात्काळ चौकशी

🔹 दोषी केंद्रचालक व अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत

🔹 अनधिकृतरीत्या घेतलेली फी व कपात शेतकऱ्यांना परत करावी

🔹 प्रत्येक केंद्रावर डिजिटल वजन यंत्रणा व CCTV अनिवार्य करावे.

🔹 MSP चे उल्लंघन करणाऱ्यांवर परवाना रद्द करण्याची कारवाई करावी.

🔹 जिल्हास्तरावर तक्रार निवारण हेल्पलाईन सुरू करावी

🔥 इशारा

याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास आजाद समाज पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

*“शेतकऱ्यांच्या घामाच्या धान्यावर डाका टाकणाऱ्यांना सोडले जाणार नाही,* असा ठाम इशारा जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी दिला.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments