चामोर्शी-मुल रस्त्यावर जाड वाहतूक तात्पुरती स्थगिती
एन.एस.यु.आय. जिल्हाध्यक्ष : राहुल वैरागडे यांची मागणी.
उपसंपादक सोनू वाळके चामोर्शी : चंद्रपूर ते नागपूर जोडणाऱ्या महत्त्वाच्या चामोर्शी-मुल रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे स्थानिक रहिवाश आणि वाहतूक करणाऱ्यांना त्रास होत आहे. हा मार्ग दररोज प्रवासी वाहतूक, टू-व्हीलर आणि मालवाहू वाहतुकीसाठी वापरला जातो.
भेंडाळा परिसरातील 14 गावांचे रहिवासी आणि शाळकरी मुले या मार्गावरून दैनंदिन व्यवहारासाठी प्रवास करतात. सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने कच्चा लोहा वाहतूक करणाऱ्या गाड्यांना अडथळा येतो आणि स्थानिकांसाठीही गाड्यांचा वापर अवघड झाला आहे.
स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्पुरती जाड वाहतूकी स्थगिती देण्याची विनंती केली आहे, जेणेकरून कामाच्या काळातही आवश्यक वाहतूक सुरळीत चालू राहील. तसेच, शाळकरी मुलांसह प्रवाशांना सुरक्षितपणे मार्गाचा वापर करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी या निवेदनात तात्काळ कारवाई करावी निवेदनकर्त्यांनी अभिषेक चौधरी, निखिल ढवरे, प्रेमानंद गोंगले, गितेश तिलकपलीवार,खुशाब मेषाखेत्री , प्रफुल भांडेकर म्हटले आहे.







