Homeगडचिरोलीछत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पाणी वाटपाचा स्तुत्य उपक्रम

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पाणी वाटपाचा स्तुत्य उपक्रम

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

चामोर्शी, दि. १९ फेब्रुवारी: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चामोर्शी येथे सामाजिक बांधिलकी जपत पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप करण्यात आले. वैभव भिवापुरे,बांधकाम सभापती, नगरपंचायत, चामोर्शी यांच्या पुढाकारातून दुपारी ४ वाजता बाजार रोड परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पर्यावरण सेल जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, नगरपंचायत उपाध्यक्ष लोमेश बुरांडे, गुरुदास सातपुते सर, लोकेश शातलवार, सतीश चिचघरे, दिलीप चलाख, नागेश भाऊ, अलसावार भाऊ, गुड्डु शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत त्यांच्या आदर्शावर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. शिवजयंतीनिमित्त आयोजित रॅलीतील शिवभक्त तसेच परिसरातील कामगारांना थंड पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले.
वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले असून, सामाजिक जाणिवेतून राबविण्यात आलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments