Homeआरोग्यराज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३, विसोरा येथील वृक्षलागवड कार्यासाठी पोलीस...

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३, विसोरा येथील वृक्षलागवड कार्यासाठी पोलीस शिपाई वासेकर सन्मानित

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३, विसोरा येथील वृक्षलागवड कार्यासाठी पोलीस शिपाई वासेकर सन्मानित

परिसर हिरवागार करण्यात मोलाचे योगदान

विसोरा लोकवाद : राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३, विसोरा येथे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेले महेश तुळशीराम वासेकर यांना राज्य राखीव पोलीस दलाच्या परिसरात वृक्षलागवड व वृक्षसंगोपनाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातर्फे सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र शासन वनविभाग, उपवनसंरक्षक वडसा वनविभाग, वडसा यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वासेकर यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

या सन्मान सोहळ्यास वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक वरूण बी. आर. (भा.प्र.से.) उपस्थित होते. तसेच समादेशक नारायण शिरगावकर, सहाय्यक समादेशक मिश्रा, सहाय्यक समादेशक लाबेवार, पोलीस निरीक्षक तुमराम, पोलीस निरीक्षक मोर्ला, पोलीस निरीक्षक पवार, गट क्र. १३ चे अंमलदार तसेच आरएफओ कैलास धोंडाने सर यांची उपस्थिती होती.

वासेकर यांच्या अथक परिश्रमामुळे पोलीस दलाचा परिसर अधिक हिरवागार व पर्यावरणपूरक झाला असून त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments