Homeगडचिरोलीगदैवाडा पोलीस मदत केंद्र येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

गदैवाडा पोलीस मदत केंद्र येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

गदैवाडा पोलीस मदत केंद्र येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

एटापल्ली (जि. गडचिरोली) :आज दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी अतिदुर्गम एटापल्ली तालुक्यातील पोलीस मदत केंद्र, गदैवाडा येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने मौजा गदैवाडा येथील भगवंतराव आश्रम शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी-शिक्षक तसेच गावातील नागरिकांनी प्रभातफेरी काढली. प्रभातफेरीदरम्यान “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा घोषणा देत संपूर्ण गावात जनजागृती करण्यात आली. प्रभातफेरी पोलीस मदत केंद्र गदैवाडा येथे ध्वजारोहण कार्यक्रमासाठी येऊन संपन्न झाली.

ध्वजारोहणाचा मान पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र कुमार (CRPF १९१ बटालियन) यांच्या हस्ते पार पडला. यानंतर त्यांनी उपस्थित महिला-पुरुष व शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमासाठी पोलीस मदत केंद्र गदैवाडाचे प्रभारी अधिकारी पो.उपनि. धनाजी एन. शिंदे, पो.उपनि. सोमनाथ यादव, परीपो.उपनि. वैजनाथ पाटील, तसेच जिल्हा पोलीस, एसआरपीएफ, सीआरपीएफचे अधिकारी-अंमलदार, एस. आर. पंधरे ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक गदैवाडा, तुषार पवार तालुका कृषी अधिकारी पं.सं. एटापल्ली, जे. पी. वाघाडे क.सहा. पं.सं. एटापल्ली, आरोग्य कर्मचारी नामदेव वासेकर, भगवंतराव आश्रम शाळा व प्राथमिक शाळेचे विद्यार्थी-शिक्षक तसेच गदैवाडा गावातील सुमारे २५० ते ३०० महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांसाठी चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments