Homeआरोग्यराज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३, विसोरा येथे १००० वृक्षांचे वृक्षारोपण

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३, विसोरा येथे १००० वृक्षांचे वृक्षारोपण

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३, विसोरा येथे १००० वृक्षांचे वृक्षारोपण

विसोरा (ता. वडसा, जि. गडचिरोली) :राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३, विसोरा येथे दिनांक ३० जुलै २०२५ रोजी “ONE MAN ONE TREE” या संकल्पनेअंतर्गत भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मा. कमांडंट भायश्री नवटके (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. श्री. निसार तांवोडी, विशेष पोलीस महानिरीक्षक, रा.रा.पो.बल परिक्षेत्र, नागपूर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.

या वृक्षारोपण कार्यक्रमात राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३ विसोरा, केंद्रीय राखीव पोलीस बल १९१ वाहिनी वडसा आणि वन विभाग वडसा यांच्या संयुक्त विद्यमाने १००० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३ विसोरा येथील सहाय्यक कमांडंट श्री. ललित आर. मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी CRPF चे सहाय्यक कमांडंट श्री. गजानन बिरगे, वन विभागाचे आरएफओ श्री. धांडे व श्री. मेहर, वनपाल लाडे मॅडम, सहाय्यक कमांडंट श्री. मारोती लांबेवार, PI वेल्फेअर ए.के. शेंदरे, PI अ‍ॅडमिन एम.एल. मोर्ला, PI HQ डी.यू. पवार, PI एस.पी. तुमराम, PSI टी.बी. ढाले, PSI अंबादे, PSI राठोड, गट रुग्णालयातील डॉ. नाकाडे मॅडम तसेच मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, अंमलदार व कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून वृक्षारोपण यशस्वीपणे पार पडले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहार व चहापानाची व्यवस्था करण्यात आली.

भविष्यातही राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३, विसोरा येथे विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सहाय्यक कमांडंट श्री. एल. आर. मिश्रा यांनी केले.

अशा प्रकारे दिनांक ३० जुलै २०२५ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments