HomeBreaking Newsचामोर्शी येथे विद्युत खांबावर झळकणारे बॅनर! प्राणांशी खेळ कोणाचा? विद्युत महामंडळ चामोर्शी(MSEB)...

चामोर्शी येथे विद्युत खांबावर झळकणारे बॅनर! प्राणांशी खेळ कोणाचा? विद्युत महामंडळ चामोर्शी(MSEB) शाखेचे धाडसी दुर्लक्ष

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

बॅनर वाले लीडर आणि विद्युत विभागाची(MSEB) साठ गाठ तर नाही?

चामोर्शी :
शहरातील विविध ठिकाणी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावण्याचे प्रमाण वाढत असून त्यामुळे थेट नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. विद्युत खांब हे उच्चदाब वीजवाहिन्यांशी जोडलेले असताना, अशा ठिकाणी बॅनर लावतांना करंट लागून जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र या गंभीर प्रश्नाकडे विद्युत महामंडळ चामोर्शी शाखेचे जाणूनबुजून दुर्लक्ष सुरू असल्याचे दिसून येत आहे. शहरातील स्थानिक लीडर, व्यापारी व आयोजक यांच्याकडून जाहिरातीचे बॅनर खांबांवर लावले जात असताना कोणतीही कारवाई होत नसणे, हा प्रकार आणखी धोकादायक बनवत आहे.
नगरातीलच एका नागरिकाने सवाल केला की, “बॅनर लावताना एखादा माणूस करंटने मरण पावला तर जबाबदारी कोण घेणार? त्या कुटुंबाचे नुकसान भरपाई कोण देणार?”
प्रश्न गंभीर आहे, कारण वीज विभागाच्या नियमाप्रमाणे विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर व तारा यांच्या आसपास जाहिराती, ध्वज, बॅनर इत्यादी लावणे कायद्याने प्रतिबंधित आहे. तरीसुद्धा कुठलेही प्रतिबंधक बोर्ड नाहीत, चेतावणी फलक नाहीत, आणि कार्यवाही तर अजिबात नाही!सर्यास आमदार,खासदार स्थानिक नगरसेवकांचे बॅनर झळकतात तरीही विद्युत विभाग गप्प!
चामोर्शीतील विद्युत विभागाकडून हा प्रश्न किरकोळ मानला जात असला तरी तो जीवघेणा ठरू शकतो. जीव गेला तर जबाबदार कोण? हा सवाल जनतेतून जोरदार उचलला जात आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments