Homeगडचिरोलीसमृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत चामोर्शीत महिला समावेशन मेळावा — 900 महिलांना योजनांचा...

समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत चामोर्शीत महिला समावेशन मेळावा — 900 महिलांना योजनांचा लाभ”

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

चामोर्शी/भेंडाळा : (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री सम्रुद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पंचायत समिती चामोर्शी तथा तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिला सक्षमीकरण तथा समावेशन मेळावा च आयोजन आज भेंडाला येथे आयोजित करण्यात आला .या कार्यक्रम प्रसंगी गट विकास अधिकारी मा . प्रकाश पोळ सहायक गट विकास अधिकारी मा .माधुरी येरमे मॅडम ,एकात्मिक बाल विकास अधिकारी  हटकर ,गट शिक्षणाधिकारी सुधीर आखाडे, तालुका विधी प्राधिकरण अधिवक्ता प्रेमा आइचवार , सरपंच  कुंदा जुवारे तालुका अभियान व्यवस्थापक श्री तुषार कर्णे, तालुका व्यवस्थापक
भारती  पेशेट्टीवार, भावना रामटेके प्रभाग समन्व्यक एकनाथ सेलोटे तसेच इतर अधिकारी यांची विचारपीठावर उपस्थिती होती.हळदी कुंकवाचा खरा अर्थ तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा कोणतीही .महिला तिच्या वैवाहिक स्थिती वरून नव्हे तर तिच्या माणूसपण यावरून सन्मानित होईल .मकर संक्रांती च्या पावन पर्वावर कोणतीही महिला शासनाच्या कोणत्याही लाभापासून वंचित राहणार नाही हा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे असे अध्यक्षीय भाषण करतांना मा. प्रकाश पोळ यांनी संकल्प केला
या समावेशन मेळाव्यात आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड ,निराधार योजना ,बाल संगोपन योजना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात येऊन विविध योजनाचा प्रत्यक्षात लाभ (प्रारभीक मंजुर ) महिलांना देण्यात आला.
सदर मेळाव्यात 900 महिला भगिनी उपस्थित होत्या.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments