तहसील ऑफिस आणि पोलीस विभाग काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चामोर्शी :-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील विटा भट्टी मालक गिरीष चव्हाण चंद्रपुर जिल्ह्यातील सावली येथील असुन बिना रॉयल्टी प्रचंड प्रमाणात अवैधरित्या रेती साठवून ठेवलेली असल्याची माहिती पुढे येताच, पत्रकार धनराज वासेकर यांनी प्रत्यक्ष जाऊन विचारणा केली. मात्र, अवैध कृत्य उघड होण्याच्या भीतीने चौहान यांनी पत्रकार यांना तुम्ही कोण? कामास काम ठेवा“सरळ आमच्या ट्रेकखाली येऊन जाल” याअगोदर आमच्या खेडी च्या भट्टीवर दोघे जण ट्रकखाली आले, अशी कबुली गिरीश चौहान यांनी उघड धमकी पत्रकाराला दिल्याचे समजते. यावरूनच रेती तस्करी किती बोकाळली आहे याचा प्रत्यय येतो. गडचिरोली सारख्या संवेदनशील जिल्ह्यात
ही परिस्थिती अती गंभीर असून राज्याचे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “रेती माफियांचे धाडस इतके वाढले की आता कोणीतरी प्रश्न विचारला तर धमक्या मिळत आहेत—म्हणजेच ‘चोर तर चोर, वरतून शीरजोर!’ अशीच स्थिती झाली आहे.” प्रशासन, तहसील, पोलीस, व खनिकर्म विभागांनी अशा अवैध साठ्यांवर तत्काळ कारवाई करून पत्रकारांना सुरक्षा सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे.
यावेळी पत्रकार ,विनोद खोबे,सोनू वाळके, अरुण गव्हारे,धनराज वासेकर, सुखसागर झाडे, प्रकाश बनसोड, उपस्थित होते समोर तहसीलदार साहेब व पोलीस विभाग काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.