HomeगडचिरोलीBDO पोळ साहेबांचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने स्वागत

BDO पोळ साहेबांचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने स्वागत

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

चामोर्शी (प्रतिनिधी): पंचायत समिती चामोर्शी येथे नव्याने रुजू झालेले प्रकाश लालासाहेब पोळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी) तथा गटविकास अधिकारी (गट ‘अ’) यांचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने पुष्पगुच्छ आणि संविधान प्रत देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. हा कार्यक्रम आज दिनांक 19 जानेवारी रोजी संपन्न झाला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांच्या उपस्थितीत शिक्षक संवर्गासह पंचायत समिती अंतर्गत इतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न व अडचणी यावरही चर्चा झाली. काही प्रलंबित मुद्द्यांवर लवकरच संघटनेसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन श्री. पोळ यांनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या स्वागत प्रसंगी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव ओमप्रकाश साखरे, जिल्हा उपाध्यक्षा सविता उराडे, तालुका अध्यक्ष मोरेश्वर भैसारे, सचिव डॉ. सचिन कुळसंगे, कार्याध्यक्ष दादाजी शेडमाके, मार्गदर्शक प्रमोद उंदीरवाडे, राहुल गेडाम, देवानंद बोरकर, रत्नदीप साखरे, कोषाध्यक्ष रुपेश खेवले, सुधाकर गेडाम, अनिल मेश्राम, जितेंद्र मुसद्दीवार, रवी खेवले, सुनील खोब्रागडे, मच्छिन्द्रनाथ हिचामी, नीता खेळकर, अर्चना हाताळकर, धर्मेंद्र बुग्गावार, चांगदेव सोरते इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments