HomeBreaking Newsचामोर्शीतील ‘MSEB चा भोंगळ कारभार! — उशिरा बिल वाटप, ग्राहकांकडून अवाजवी दंड...

चामोर्शीतील ‘MSEB चा भोंगळ कारभार! — उशिरा बिल वाटप, ग्राहकांकडून अवाजवी दंड वसुली? बिलाची लास्ट तारीख 17, वाटप मात्र 20 ला! — ‘MSEB’ची लाखो रुपयांची लूट?

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

चामोर्शी (प्रतिनिधी):

चामोर्शीत महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाचा (MSEB) भोंगळ आणि बेफिकीर कारभार दिवसेंदिवस उघड होत असून, नागरिकांचा उकळून-पाक होतोय. कागदोपत्री पारदर्शकतेचे दावे करणाऱ्या MSEBने प्रत्यक्षात ग्राहकांचे लाखो रुपयांचे नुकसान घडवून आणल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत.
पहिला खेळ — बिल वाटपाचा विलंब!
वीजबिलाची लास्ट तारीख 17 असताना, ग्राहकांना बिल 20 तारीख किंवा त्यानंतर दिले जात आहे. आणि मग सिस्टममधून आपोआप ₹10 दंड (Due) आकारला जातो.
म्हणजे चूक विभागाची — दंड मात्र ग्राहकाचा!
दुसरा खेळ — रीडिंगही वेळेवर नाही!
याहून गंभीर म्हणजे, वीजमीटर रीडिंग सुद्धा वेळेवर घेतले जात नाही.

परिणामी:
युनिट काउंट वाढतो
बिल स्लॅब वाढतात
बिलाचा दर प्रति युनिट जास्त
एकूण बिल अनैसर्गिकपणे फुगवले जाते!

ग्राहकांचा थेट आरोप:
आम्ही चूक केली नसताना आम्हालाच दंड! रीडिंग उशीरा घेऊन बिल फुगवायचं आणि मग पैसे वसूल करायचे — हा कोणता न्याय?”

ग्रामीण आणि दुरभागातील अनेक ग्राहकांना तर बिल तारीख निघून गेल्यानंतरच मिळते. डिजिटल बिलिंगचे दावे फक्त पत्रकापुरते, प्रत्यक्षात मात्र सिस्टिमेटिक लूट सुरू असल्याचा आरोप आहे.
प्रशासनाचे डोळे झाक
तक्रारी करूनही MSEB अभियंते आणि स्थानिक अधिकारी याकडे ढिम्म लक्ष देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विभागाने यावर एकही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.
स्थानिकांचा सवाल:
बिल वेळेवर का दिले जात नाही?
रीडिंग उशीरा का घेतले जाते?
दंड ग्राहकचकावरच का फोडला जातो?
फुगवलेल्या बिलाची जबाबदारी कोणाची?
चामोर्शीमध्ये सुरू असलेला हा लाखो रुपयांचा घोटाळा आहे की गैरव्यवस्थेचा परिणाम? हा मोठा प्रश्न असून, यावर त्वरित चौकशी होणे ही काळाची गरज आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments