Homeगडचिरोलीडॉ.बी.आर.आंबेडकर विद्यालय वायगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा उत्साहात संपन्न

डॉ.बी.आर.आंबेडकर विद्यालय वायगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा उत्साहात संपन्न

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

चामोर्शी/वायगाव

भारतरत्न डॉ.बी.आर. आंबेडकर विद्यालय, वायगाव येथे गोंडी नृत्य रॅलीसह विविध उपक्रम, सप्तखंजीरीवादक प्रबोधनपर तुषार सूर्यवंशी यांचा कार्यक्रम… 

चामोर्शी तालुक्यातील येनापूर केंद्रांतर्गत येणाऱ्या वायगाव येथील भारतरत्न डॉ.बी.आर. आंबेडकर विद्यालयामध्ये माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात संपन्न झाला. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे शालेय परिसरात आठवणींना उजाळा देणारे भावनिक व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.
या स्नेहमेळाव्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आदिवासी गोंडी नृत्याची भव्य रॅली, पारंपरिक वेशभूषेत साकारलेल्या या रॅलीने संपूर्ण गावात आनंदीमय व सांस्कृतिक वातावरण पसरवले, ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीने ग्रामस्थांचेही लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने उपस्थित मान्यवरांचे व माजी विद्यार्थ्यांचे मन जिंकले. त्यानंतर विविध सांस्कृतिक नृत्याविष्कार सादर करण्यात आले.
शालेय आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. “एक विद्यार्थी – एक झाड” या भावनेतून माजी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यानंतर माजी विद्यार्थ्यांतर्फे संस्थेचे पदाधिकारी पि.जी.उंदिरवाडे,डि.डी.मेश्राम, डि.आर.साखरे,देवराव पाटील उंदिरवाडे,टि.डी.मेश्राम,के.के. तावाडे, अनिता पुच्छलवार,दिपक उंदिरवाडे, तर सेवानिवृत्त मुख्याध्यापक जितेंद्र मेश्राम,गेडाम सर,जेष्ठशिक्षक एम.बी.मडावी ,एस.जी.गजभिये,आर.जी.रामटेके, तसेच सध्या कार्यरत मुख्याध्यापक,शिक्षक एस.के.वाढई,आर.डी.उराडे,के.एल.बन्सोड,डि.एच.वालदे,एस. एम. कोचे,एस.बी.आलेवार, उत्तरवार सर ,गेडाम मॅडम, अशोक गजभिये सर व शिक्षकेतर कर्मचारी पि .के . उंदिरवाडे,एस आर वाटे,वाय.एन.पुच्छलवार,व सेवानिवृत्त सिध्दार्थ गोंगलेजी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. शाळेच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या सर्व शिक्षकांविषयी माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थेचे अध्यक्ष पि.जी.उंदीरवाडे, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव डि.डी.मेश्राम,प्रमुख अतिथी संस्थेचे पदाधिकारी देवराव पाटील उंदिरवाडे, मार्गदर्शक म्हणून प्राचार्य संतोष उंदिरवाडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जितेंद्र मेश्राम, शाळेचे मुख्याध्यापक एस.के.वाढई उपस्थित होते. मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य संतोष उंदिरवाडे यांनी माजी विद्यार्थ्यांनी शाळेशी नाते कायम ठेवून शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक जितेंद्र मेश्राम यांनी शाळेच्या वाटचालीचा आढावा घेताना माजी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मनोगतामध्ये प्रफुल्ल खोब्रागडे यांनी व इतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणी, अनुभव व यशकथा शेअर केल्या.या स्नेहमेळाव्यामुळे पिढ्यान्‌पिढ्यांतील नाते अधिक दृढ झाले असून, भविष्यात शाळेच्या विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कालिंदा बारसागडे व संदीप बारसागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य प्रमोद मेश्राम यांनी मानले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी अध्यक्ष प्रिंतम घोनमोडे, सहसचिव चेतन दुर्गे, कोषाध्यक्ष विनोद मडावी, उपाध्यक्ष मनिषा मेश्राम,सहकोषाध्यक्ष विरेंद्र लाकडे, अर्पणा उंदीरवाडे, प्रफुल्ल खोब्रागडे, प्रमोद मेश्राम, डॉ.नामदेव पेंदाम,चरनदास कुमरे, संदिप बारसागडे, संदिप कुकडे,सुलोज मडावी, किशोर आत्राम, यादव वेटकर,इतर माजी विद्यार्थी,शेवटी स्नेहमिलन सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments