सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
चामोर्शी: तालुक्यात ग्राहक अधिकार जागृतीला गती मिळावी या उद्देशाने अखिल भारतीय ग्राहक पंचायतची चामोर्शी तालुका कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली. स्थानिक केवळरामजी हरडे महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी (११ जानेवारी) आयोजित सभेत नवीन कार्यकारिणी जाहीर झाली.
या कार्यकारिणीत अध्यक्षपदी विनोद खोबे, उपाध्यक्षपदी प्रकाश घोगरे, तर सचिवपदी अरुण गव्हारे यांची निवड करण्यात आली. तसेच कोषाध्यक्षपदी बबन वडेट्टीवार, ग्राहक मार्गदर्शक केंद्र प्रमुख अनिता ढगे, सहप्रमुख संजना सोमनकर, प्रचार प्रमुख चंद्रकांत कुनघाडकर, पर्यावरण प्रमुख विजय कोमेरवार, आयटी प्रमुख किशोर गेडाम, विधी प्रमुख ऍड. डिंपल उंदिरवाडे यांची नियुक्ती झाली.
सदस्य म्हणून प्रा. दिलीप टेप्पलवार, अमित साखरे, प्रा. नोमेश्र्वर उरकुडे, प्रा. किशोर ओल्लालवार, प्रा. विठ्ठल चौथाले व अमोल अमगावकर यांचा समावेश आहे.
सभेला अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत चे कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत पतरंगे, मार्गदर्शक विजय कोतपल्लीवार, जिल्हाध्यक्ष उदय धकाते, सचिव अरुण पोगळे व उपाध्यक्ष डॉ. महेश जोशी उपस्थित होते.
सभेचे प्रस्ताविक चंद्रकांत पतरंगे यांनी केले, तर संचालन डॉ. महेश जोशी यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन संजना सोमनकर यांनी मानले.
या निवडीमुळे तालुक्यात ग्राहक संरक्षण, मार्गदर्शन व जागृती उपक्रमांना नवे बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.