Homeगडचिरोलीसेवानिवृत्त शिक्षक अतुल येलमुले यांचा सन्मान; भिसी समूहाच्या परंपरेप्रमाणे भावपूर्ण सत्कार

सेवानिवृत्त शिक्षक अतुल येलमुले यांचा सन्मान; भिसी समूहाच्या परंपरेप्रमाणे भावपूर्ण सत्कार

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

तालुका प्रतिनिधी, चामोर्शी :

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ (तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली) अंतर्गत भिसी समूहाच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक अतुल येलमुले यांचा भावपूर्ण व सन्मानपूर्वक सत्कार सोहळा चामोर्शी येथे पार पडला. साधुबाबा कुटीजवळील हनुमान मंदिराच्या सभागृहात हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास संघाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कुनघाडकर, जिल्हा संघटक सचिव कालिदास बन्सोड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी येलमुले सरांच्या प्रदीर्घ, निष्ठावान व विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक सेवेला उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना संजय कुनघाडकर म्हणाले, “अतुल येलमुले यांनी शिक्षक म्हणून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली. त्यांचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.”
तर कालिदास बन्सोड यांनी शिक्षक संघटनेच्या कार्यात येलमुले सरांचे योगदान अधोरेखित करत त्यांच्या भविष्यातील कार्यास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी येलमुले सरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मनोगतात त्यांनी संघटना, सहकारी शिक्षक व उपस्थितांचे आभार मानत सेवानिवृत्तीनंतरही शैक्षणिक व सामाजिक कार्याशी जोडून राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
या कार्यक्रमाला भिसी समूहातील जिल्हा उपाध्यक्ष संजय कुनघाडकर, संघटक सचिव कालिदास बन्सोड, जिल्हा सदस्य विनोद सालेकर, तालुका कार्यवाह प्रोपेश्वर लडके, तालुका कार्याध्यक्ष संजय आलेवार, कोषाध्यक्ष अरविंद कुनघाडकर, संतोष बोडुकवार, संतोष चावरे, सौ. स्मिता चट्टे, किसनदेव टिकले, रुपेश अमलपुरीवार, रुषीदेव वासेकर यांच्यासह शिक्षक बांधव, संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम सौहार्दपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments