Homeगडचिरोलीवैनगंगा-पोहार संगमावरील ‘दागोबा’ देवस्थानी विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रम; परिसर स्वच्छतेने नागरिकांत समाधान

वैनगंगा-पोहार संगमावरील ‘दागोबा’ देवस्थानी विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रम; परिसर स्वच्छतेने नागरिकांत समाधान

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

चामोर्शी/गडचिरोली
चामोर्शी तालुक्यातील तळोधी मोकासा परिसरातील वैनगंगा व पोहार नदीच्या संगमावर वसलेल्या पंचक्रोशीतील भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या दागोबा देवस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाचणगावं (देवळी) येथील विद्यार्थी, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
मुख्याध्यापक ओमप्रकाश साखरे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भावीक सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी श्रमदान करून देवस्थान परिसरातील कचरा व घाण हटवली. येथे भाविक मोठ्या संख्येने सहकुटुंब येऊन पूजा-अर्चा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम करीत असल्याने काही प्रमाणात अस्वच्छता पसरलेली होती. मात्र शाळेच्या उपक्रमामुळे परिसर पुन्हा स्वच्छ झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
स्वच्छता उपक्रमात किरण बोरीकर, अरुण बारसागडे, पुरुषोत्तम सोनटक्के, धनराज लटारे, कैलास बारसागडे, प्रियंका बारसागडे, नितीशा बोईनवार, कविता लटारे, संगीता सोनटक्के, लीला बारसागडे, दीपाली सोनटक्के, प्रियंका शेट्टे, पायल कुकुडकर यांनी सहकार्य केले.
दरम्यान, केंद्रप्रमुख माणिक वरपडे व गट समन्वयक चांगदेव सोरते यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments