आर्वी (वर्धा) | प्रतिनिधी : भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक शौर्य दिनाच्या पावन निमित्ताने मार्शल अर्पित वाहाणे यांनी केलेले रक्तदान हे केवळ एक सामाजिक उपक्रम न राहता, मानवतेला दिलेली सशक्त सलामी ठरली आहे. सामाजिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष वाढत असलेल्या काळात, अर्पित वाहाणे यांनी कृतीतून समाजभान जपले असल्याचे दिसून येते.
रक्ताची गरज ही जात, धर्म, वेळ अथवा परिस्थिती पाहून येत नसते. अपघात, गंभीर आजार, शस्त्रक्रिया वा आपत्कालीन प्रसंगात रक्त हेच जीवन वाचविण्याचे एकमेव प्रभावी साधन ठरते. हीच जाणीव ठेवत, अर्पित वाहाणे यांनी स्वतःहून पुढाकार घेत रक्तदान करून “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश समाजासमोर ठामपणे मांडला.
या रक्तदानामुळे केवळ एका रुग्णाचेच नव्हे, तर अनेक कुटुंबांचे जीवन सुरक्षित होण्याची आशा निर्माण झाली आहे. हे कार्य वैयक्तिक न राहता समाजातील युवक, नागरिक व सर्वसामान्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
मार्शल अर्पित वाहाणे यांच्या या मानवतावादी आणि धाडसी कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्या पुढाकारामुळे अनेक युवक रक्तदानासाठी प्रेरित होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शौर्य, माणुसकी आणि समाजभान यांचा संगम साधणारे हे रक्तदान निःसंशय गौरवास्पद व अनुकरणीय असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.