Homeगडचिरोलीक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व युगपुरुष जयपाल सिंह मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व युगपुरुष जयपाल सिंह मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

गडचिरोली | प्रतिनिधी
राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती विकास परिषद, नवी दिल्ली – जिल्हा गडचिरोली यांच्या कार्यालयात आज दि. ३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि आदिवासी हक्कांचे महान नेते युगपुरुष जयपाल सिंह मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांनी १९व्या शतकात रूढी-परंपरांच्या विरोधात उभारलेल्या शिक्षण क्रांतीचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले. महिलांना व वंचित समाजाला शिक्षणाचा मार्ग खुला करून त्यांनी सामाजिक परिवर्तनाची पायाभरणी केली, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले.
तसेच भारतीय संविधान सभेत आदिवासी समाजाच्या भूमी, जंगल, संस्कृती व स्वायत्ततेसाठी ठाम व निर्भीड भूमिका मांडणारे युगपुरुष जयपाल सिंह मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. आदिवासी हक्कांसाठी त्यांनी दिलेला संघर्ष आजही प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती विकास परिषद, नवी दिल्ली – जिल्हा गडचिरोलीचे उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र वि. उंदिरवाडे, वर्षा एच. रामटेके, राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प. गट) शहराध्यक्ष अमोलभाऊ कुळमेथे, कुणाल कोवे सर, प्रशांत डी. रायपूरे, शुभम वनकर, कु. रेशमा रामटेके, गौतमी बांबोळे, शीतल भडके, विकास दुधबळे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सावित्रीबाई फुले व जयपाल सिंह मुंडा यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments