Homeगडचिरोलीचामोर्शी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात...

चामोर्शी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

विद्या विना मती गेली,
मती विना गती गेली,
गती विना वित्त गेले,
वित्त विना शूद्र खचले.”

इतके अनर्थ एका अविद्येने केले!

चामोर्शी : 
चामोर्शी येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मा. केंद्रप्रमुख माणिक वरपडे सर यांनी प्रमुख मार्गदर्शन करत सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून विद्यार्थी जीवनाचे महत्त्व, शिक्षणाचे मोल व समाजपरिवर्तनातील त्याची भूमिका याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यापिका स्नेहल टिचकुले यांनी केले, तर ज्येष्ठ अध्यापिका रंदये मॅडम यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. खुशी वानखेडे यांनी तर आभारप्रदर्शन कु. आस्था गडपायले यांनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमाची पूर्वतयारी व व्यवस्थापन इयत्ता ९ वी मराठीच्या विद्यार्थ्यांनी समर्थपणे पार पाडले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संदेश देत हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.
lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments